IND vs SL 1st ODI 2021: भारतीय संघाचा ‘गब्बर’ शिखर धवन (Shikhar Dhawan) श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka Tour) आजपासून कर्णधाराच्या भूमिकेत दिसत आहे. सर्वात पहिल्या कर्णधार म्हणून आपल्या डेब्यू सामन्यात धवनने काही मोठे पराक्रम केले. सर्वप्रथम तो कर्णधार म्हणून पदार्पण करणारा सर्वत वृद्ध खेळाडू ठरला. त्याने वयाच्या 36 व्या वर्षी 255 दिवशी हा पराक्रम केला. पण त्यानंतर जेव्हा तो फलंदाजीला आला तेव्हा त्याने आणखी दोन मोठे विक्रम आपल्या नावावर केले. टीम इंडियाचा (Team India) अनुभवी सलामी फलंदाज धवन वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 6000 धावांचा पल्ला गाठणारा भारताचा दुसरा फलंदाज ठार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारा देखील धवन आता सहावा वेगवान भारतीय फलंदाज बनला आहे. शिवाय, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) 1000 धावा पूर्ण करत धवन फलंदाजांच्या स्टार-स्टडेडच्या यादीत सामील झाला आहे. (IND vs SL 1st ODI: वेलकम बॅक! कुलदीप यादवचे दणदणीत पुनरागमन, एकाच ओव्हरमध्ये दोन लंकन फलंदाजांना धाडलं माघारी)
धवनला आजच्या सामन्यापूर्वी 6000 धावा पूर्ण करण्यासाठी 23 धावांची गरज होती. भारताकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 6000 धावा करणारा तो दहावा खेळाडू ठरला आहे. 2010 मध्ये धवनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. गेल्या 11 भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळत धवनने 143 सामन्यांत 6000 पेक्षा अधिक धावा केल्या असून यादरम्यान त्याने 17 शतकही ठोकले आहेत. इतकेच नव्हे तर धवन भारतासाठी वेगवान 6000 धावा करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने 136 डावात ही कमाल केली तर 140 व्या डावात ही कमाल केली असून त्याने माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांना एलिट यादीत मागे टाकले ज्यांनी हा पल्ला गाठण्यासाठी 147 वनडे डाव खेळले होते. तसेच, धवन पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यात भारताचे नेतृत्व करत आहे. तर शिखर एकदिवसीय सामन्यात नेतृत्व करणारा 25 वा भारतीय कर्णधारही ठरला आहे.
1⃣0⃣0⃣0⃣0⃣ more reasons to love Gabbar 🔥
6th Fastest 🇮🇳 to the milestone and the 5th Fastest sitting in the dugout would surely be pleased with that one 🤩#SLvIND #ShikharDhawan pic.twitter.com/AaVBf7XUsI
— Delhi Capitals (Stay Home. Wear Double Masks😷) (@DelhiCapitals) July 18, 2021
दुसरीकडे, शिखर धवनने सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10000 धावा पूर्ण केल्या आहेत. धवन हा भारताचा सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10000 धावा करणारा 5 वा फलंदाज ठरला आहे. धवनने यापूर्वी सलामीवीर, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग आणि सुनील गावस्कर यांनी ओपनर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा मानाचा टप्पा ओलांडला आहे.