IND vs SA U19 World Cup Semi Final: आयसीसी अंडर-19 विश्वचषक 2024 मध्ये (ICC U19 World Cup 2024) भारतीय संघाचा सामना 6 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेशी (IND vs SA U19 World Cup Semi Final ) होणार आहे. भारतीय संघाने सुपर सिक्सच्या सामन्यात नेपाळचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता टीम इंडिया उपांत्य (Team India) फेरीत यजमान दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) सामना करण्यासाठी सज्ज आहे. भारतीय संघाने आतापर्यंत अंडर-19 विश्वचषक 2024 मध्ये आपले सर्व सामने जिंकले आहेत. सर्व सामने जिंकून टीम इंडिया आपल्या गटात पहिल्या क्रमांकावर राहिली. आता भारतीय संघाला उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश करायचा आहे.
कधी अन् कुठे पाहणार सामना?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना मंगळवार, 6 फेब्रुवारी रोजी विलोमूर पार्क येथे होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचा थेट आनंद घेऊ शकता. याशिवाय, सामना डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित केला जाईल. जिथे तुम्ही सामन्याचा विनामूल्य आनंद घेऊ शकता. (हे देखील वाचा: Vinesh Phogat Wins Gold Medal: विनेश फोगटने राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये महिलांच्या 55 किलो गटात जिंकले सुवर्णपदक)
विश्वचषकमध्ये कसा होता भारताचा प्रवास
अंडर-19 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघ बांगलादेशसोबत पहिला सामना खेळला. टीम इंडियाने हा सामना 84 धावांनी जिंकला. यानंतर टीम इंडियाची आयर्लंडशी टक्कर झाली. या सामन्यात टीम इंडियाने 201 धावांनी विजय मिळवला होता. यानंतर टीम इंडियाचा तिसऱ्या सामन्यात अमेरिकेशी सामना झाला. या सामन्यात भारताने अमेरिकेचा 201 धावांनी पराभव केला. चौथ्या सामन्यात भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडशी झाला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 214 धावांनी पराभव केला. यानंतर सुपर सिक्सच्या अखेरच्या सामन्यात भारताचा सामना नेपाळशी झाला. भारताने हा सामना 132 धावांनी जिंकला होता.
मुशीर खानवर असेल नजर
19 वर्षांखालील विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज मुशीर खानकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुशीर खानने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. मुशीर खानने 19 वर्षाखालील विश्वचषक 2024 मध्ये आतापर्यंत 5 सामन्यात 334 धावा केल्या आहेत. मुशीर खान या स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. याशिवाय टीम इंडियाचा कर्णधार उदय सहारनही जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. उदयने या स्पर्धेत आतापर्यंत 304 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 1 शतक आणि 2 अर्धशतके झळकावली आहेत. तर गोलंदाजीत टीम इंडियाच्या सौम्या पांडेने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. सौम्याने आतापर्यंत 5 सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियाला या खेळाडूंकडून खूप अपेक्षा असतील.