South Africa National Cricket Team vs India National Cricket Team: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये चार सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. सध्या मालिकेतील तीन सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 2 सामने टीम इंडियाने आणि एक सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला आहे. आता मालिकेतील शेवटचा सामना आज रात्री साडेआठ वाजता होणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका 3-1 ने जिंकायची आहे, तर दक्षिण आफ्रिकेला मालिका 2-2 ने संपवायची आहे. आज अखेरच्या टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या युवा खेळाडूला पदार्पणाची संधी मिळू शकते. (हे देखील वाचा: IND vs SA 4th T20I Pitch Report: आजच्या सामन्यात कोणाचे असणार वर्चस्व फलंदाज की गोलंदाज? जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल)
'या' खेळाडूला मिळू शकते संधी?
टीम इंडियाने तिसऱ्या टी-20 सामन्यात शानदार विजय मिळवला होता, पण शेवटी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना ज्याप्रकारे झोडपून काढले, त्यामुळे टीम इंडिया हा सामना हरणार असे वाटत होते. तिसऱ्या सामन्यात रमणदीप सिंगला टीम इंडियासाठी पदार्पणाची संधी मिळाली. रमणदीपचे पदार्पणही चांगले झाले आणि त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. आज कर्णधार सूर्यकुमार यादव युवा वेगवान गोलंदाज विजयकुमारला संधी देऊ शकतो. विजयकुमारची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या संघात निवड झाली आहे, मात्र अद्यापपर्यंत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही.
भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरु होणार सामना
आयपीएल 2024 मध्ये विजयकुमारला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना पाहिले. आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये 11 सामने खेळले आहेत. या काळात विजयकुमारने गोलंदाजी करताना 13 बळी घेतले आहेत. चौथा आणि शेवटचा टी-20 सामना आज जोहान्सबर्गच्या द वांडरर्स स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता खेळवला जाईल. सध्या टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. मागच्या सामन्याचा हिरो ठरलेल्या तिळक वर्माकडून चाहत्यांना पुन्हा एकदा शानदार कामगिरीची अपेक्षा असेल.