IND vs SA 3rd Test: केप टाउनमध्ये भारत-दक्षिण आफ्रिकेत आर-पारची ‘कसोटी’, ‘विराटसेने’च्या ऐतिहासिक विजयात ‘हे’ दोन खेळाडू ठरणार सर्वात मोठा अडथळा
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd Test: केप टाउनच्या (Cape Town) न्यूलँड्स येथे ‘आरपार’च्या लढतीसाठी भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) सज्ज आहे. 11 जानेवारीपासून मालिकेचा तिसरा व अंतिम सामना रंगणार आहे. सध्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत त्यामुळे अंतिम सामन्यात कोणता संघ बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. टीम इंडिया (Team India) दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याच्या उद्देशाने पुन्हा एकदा मैदानात उतरेल. मात्र, केप टाऊनमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला राहिला नाही. त्यामुळे भारतीय संघ (Indian Team)  खराब रेकॉर्ड सुधारण्यात यशस्वी ठरेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (IND vs SA: निर्णायक ‘कसोटी’साठी टीम इंडिया खेळाडू केपटाऊनमध्ये दाखल, पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात झाले भव्य स्वागत, पहा व्हिडिओ)

भारताने केप टाउनमध्ये आतापर्यंत 5 कसोटी सामने खेळले असून त्यांना एकदाही येथे विजय मिळवता आलेला नाही. तसेच दोन सामने अनिर्णित राहिले तर तीनमध्ये त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तथापि या सामन्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या दोन क्रिकेटपटूंबाबत टीम इंडियाला सावधगिरी बाळगावी लागणार आहे. केप टाउनमध्ये या दोन्ही खेळाडूंची कामगिरी उत्कृष्ट आहे.

कगिसो रबाडा

केप टाउन कसोटीत वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाविरुद्ध टीम इंडियाला सावध राहावे लागणार आहे. रबाडाने केप टाउनमध्ये 6 कसोटी सामन्यात 35 विकेट घेतल्या आहेत. तसेच एनरिच नॉर्टजेच्या अनुपस्थितीत, रबाडाने दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान आक्रमणाचे नेतृत्व केले आणि जोहान्सबर्ग व सेंच्युरियनमध्ये भारतीय फलंदाजांना त्रास दिला. रबाडाची केप टाउनमधील कामगिरी प्रभावी असल्याने त्याच्या भीतीला तोंड देण्यासाठी भारतीय फलंदाजांना नवा मार्ग शोधावा लागणार आहे.

डीन एल्गर

रबाडा शिवाय भारतीय संघासमोर दुसरा सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो तो म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर. जोहान्सबर्गमध्ये मॅच-विनिंग डाव खेळणाऱ्या या आफ्रिकी कर्णधाराने केप टाउनमध्ये 10 कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्याने तीन अर्धशतके आणि काही शतकां सह 708 धावा केल्या आहे. अशा धुरंधर खेळाडूंवर मात करून टीम इंडियाला इतिहास रचण्याचा मार्ग शोधावा लागणार आहे.