IND vs SA 3rd Test Day 3: दक्षिण आफ्रिका पहिल्या डावात 162 धावांवर ऑल-आऊट, भारताने दिला फॉलोऑन
भारतीय संघ (Photo CreditL IANS)

रांचीमधील तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार खेळी करत दक्षिण आफ्रिका संघाला पहिल्या डावात 162 धावांवर ऑल-आऊट केले आणि 335 धावांची आघाडी मिळवली. आणि आफ्रिकेला फॉलोऑन दिला. यंदाच्या मालिकेत भारताने दुसऱ्यांदा फॉलोऑन दिला आहे. यापूर्वी, दुसऱ्या टेस्टमधेही भारताने फॉलोऑन दिला होता.  पहिल्या डावात आफ्रिकाकडून झुबैर हमजा याने सर्वाधिक 62 धावा केल्या. याशिवाय, टेंबा बावमा याने 32 धावांचे योगदान दिले. भारताकडून उमेश यादव याने सर्वाधिक 3 गडी बाद केले तर, मोहम्मद शमी, शाहबाझ नदीम आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.  भारताने पहिला डाव 497 धावांवर घोषित केल्यावर भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकी फलंदाजांना खेळण्याची संधीच दिली नाही आणि एकामागोमाग एक विकेट घेत आफ्रिकी संघावर दबाव बनवून ठेवला. भारताने दुसऱ्या दिवशी टी वेळेनंतर डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. भारताने केलेल्या मोठ्या धावसंख्येचा प्रत्युत्तरात आफ्रिका संघाची सुरुवात चांगली झाली नाही. (IND vs SA 3rd Test: डॉन ब्रॅडमन यांचा 71 वर्ष जुना रेकॉर्ड मोडत 'हिटमॅन' रोहित शर्मा याने केली नवीन विक्रमाची नोंद, जाणून घ्या)

पहिल्या डावाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका संघाने 9 धावांवर 2 विकेट गमावले. त्याच्यानंतर सलग दुसऱ्यांदा खराब प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचाही खेळ निश्चित वेळेआधी खेळ थांबवला. यांच्यानंतर तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दबाव बनवून ठेवला होता. दिवसाच्या सुरुवातीलाच उमेशने फाफ डू प्लेसिस याला बाद केले. त्यानंतर आफ्रिका संघाच्या फलंदाजांची बाद होण्याचे सत्र सुरूच राहिले. टेंबा बावुमा 32 धावा आणि जॉर्ज लिंडे 37 धावांवर माघारी परतला. हमझा, बावुमा आणि लिंडेऐवजी अन्य कोणताही फलंदाजी दुहेरी धावसंख्या करू शकला नाही.

यापूर्वी, पहिले फलंदाजी करत भारतीय फलंदाज रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी संघाच्या खराब सुरुवातीनंतर डाव सावरला आणि टीमला मोठ्या स्कोरकडे नेऊन पोहचवले. रोहित टेस्टमध्ये पहिले दुहेरी शतक करत 212 धावांवर बाद झाला तर, रहाणेन 115 धावांवर माघारी परतला. दोन्ही फलंदाज आऊट झाल्यावर रवींद्र जडेजा आणि उमेश यादव यांनी अनुक्रमे 51 आणि 31 धावांची खेळी करत महत्वाचे योगदान दिले.