रोहित शर्मा, डॉन ब्रॅडमन (Photo Credit: IANS/Getty)

घरच्या कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम सरासरीमध्ये भारतीय संघाचा सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याने ऑस्ट्रेलियाचा (Australia) महान फलंदाज डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांना पिछाडीवर टाकले. रोहितने ब्रॅडमनचा 71 वर्षांचा रेकॉर्ड मोडला. दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाविरुद्ध शानदार फॉर्म कायम ठेवला आहे. आफ्रिकाविरुद्ध साध्य सुरु असेलेल्या मालिकेत रोहितने पहिल्या मॅचमध्ये 176 आणि 127 धावा केल्या होत्या. मात्र, दुसऱ्या मॅचमध्ये रोहित खास कामगिरी करू शकला नाही. पण, रांचीमध्ये सुरु असलेल्या मालिकेच्या शेवटच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात रोहितने कसोटी कारकीर्दीतील पहिले दुहेरी शतक ठोकले. रोहितने आतापर्यंत या मालिकेच्या चार डावांमध्ये 529 धावा केल्या आहेत. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बाद होण्यापूर्वी त्याने 255 चेंडूत 83.13 च्या स्ट्राइक रेटने 212 धावा फटकावल्या. या दरम्यान रोहितने 28 चौकार व 6 षटकारही मारले. (IND vs SA 3rd Test: सलग दोन षटकार मारत उमेश यादव झाला सचिन तेंडुलकरच्या 'या' एलिट यादीत सामील, टेस्टमध्ये केली सर्वाधिक स्ट्राईक रेटची नोंद)

रोहितच्या दुहेरी शतकानंतर त्याने घरच्या मैदानावर कसोटीत सरासरी 99.84 झाली आहे. यासह रोहित घरच्या मैदानावर किमान 10 डावांमध्ये सर्वाधिक सरासरीसह धावा करणारा फलंदाज बनला आहे. या प्रकरणात त्याने ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडला. ब्रॅडमनने 1928-48 दरम्यान घरच्या कसोटी सामन्यांमध्ये 98.22 च्या सरासरीने 4332 धावा केल्या तर रोहितने 18 डावांमध्ये 1298 धावा केल्या आहेत.

रोहितने लुंगी एनगीडी च्या ओव्हरमध्ये षटकार मारत कसोटीतील पहिले दुहेरी शतक पूर्ण केले. त्याने अजिंक्य रहाणे बरोबर चौथ्या विकेटसाठी 267 धावांची भागीदारी केली आणि संघाला मजबूत स्थितीत नेले. दरम्यान, रोहीतने यंदाच्या मालिकेत तिसरे शतक केले. 1978 मध्ये सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध सलामीवीर म्हणून कसोटी मालिकेत तीन किंवा त्याहून अधिक शतके ठोकली होती. रोहित आता हे करणारा दुसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे.