भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात रांचीमध्ये तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा शेवटचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे तर दुसरीकडे प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांना मात्र ट्रोल केले जात आहे. तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 162 धावांवर ऑल आऊट केल्यावर भारताने दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन दिला. इथेही भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांना उघडपणे खेळण्याची संधी दिली नाही आणि दिवसाखेर 132 धावांवर 8 विकेट घेत संघाचा विजय निश्चित केला. यादरम्यान, मुख्य प्रशिक्षक शास्त्रींचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि यूजर्सने मिळालेली संधी हातातून सोडली नाही आणि त्यांना ट्रोल करायचे सुरु केले. (IND vs SA 3rd Test: दक्षिण आफ्रिका संघ एक डाव आणि 202 धावांनी पराभूत, 3-0 क्लीन-स्वीप करत टीम इंडियाने मिळवला ऐतिहासिक विजय)
कसोटी सामन्याच्या तिसर्या दिवशी शास्त्री ड्रेसिंगरूम मध्ये झोपत असतानाच फोटो व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर यूजर्सना त्यांना ट्रोल करण्याची संधी मिळाली. काहींनी शास्त्रींच्या या फोटोवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या तर काहींनी त्याच्यावर हटके मिम्सदेखील बनवून व्हायरल केले. एका यूजरने लिहिले की शास्त्री केवळ झोपण्यासाठी 10 कोटी रुपये घेत आहेत, तर एका यूजरने लिहिले की शास्त्री जगातील सर्वात सोयीस्कर नोकरी करतात. पहा शास्त्रींचा 'तो' फोटो:
या प्रकारे सोशल मीडिया यूजर्सने दिल्या शास्त्रींच्या फोटो वर प्रतिक्रिया:
शुबमन गिल: 10 कोटी / वर्ष झोपेसाठी...
Shubman Gill Be Like.. :-
10 Cror/Year For sleeping..🙄 😂
What A Lucky Guy He is..👇#INDvsSA #RaviShastri pic.twitter.com/fpxfK5a2gk
— Vasu Jain (@vasu_1001) October 21, 2019
उत्कृष्ट 10 कोटींची नोकरी
#INDvsSAThe best job 10 crores for sleeping and boozing ! #INDvsSA#RaviShastri @RaviShastriOfc @SGanguly99 @BCCI @imVkohli pic.twitter.com/CqUuwcZy9X
— Rohit Bareth (@rohit_bareth) October 21, 2019
RT जर आपल्याला वाटते की वर्षामध्ये 10 कोटी मिळवण्यासाठी ही सर्वोत्कृष्ट नोकरी आहे
RT If You Think This Is The Best Job To Earn 10 Crore In A Year 🤣 #INDvsSA pic.twitter.com/utBnBQa6IY
— Le Sir Jadeja Fan (@SirrrJadeja) October 21, 2019
जेव्हा आपण आपल्या मोबाइलवर बॉम्बे व्हेलवेट पाहण्याचा प्रयत्न करता
This happens when you try to sneak in & watch Bombay Velvet on your mobile, while the Test Match is on! #RaviShastri #shastri #INDvsSA #INDvSA #sleepingbeauty pic.twitter.com/q2NIptj4ET
— Rajiv Pal Satirism (@coolrajivpal) October 21, 2019
कंडक्टर बोलता तिकीट
मी:
कंडक्टर: बोला टिकेट टिकेट,
Me: pic.twitter.com/D9HjQT6hBV
— SHAIKH IRFAN | عرفان (@iam_shaikhirfan) October 21, 2019
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध नऊ गडी गमावून भारताने पहिला डाव 497 धावांवर घोषित केला होता. यानंतर तिसर्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 162 धावांवर लोटांगण घातलं आणि त्यानंतर भारताने यंदाच्या मालिकेत दुसऱ्यांदा फॉलोऑन दिला. पण, आफ्रिकेची स्थिती काही सुधारली नाही आणि चौथ्या दिवशी भारताने आफ्रिकेचा एक डाव आणि 202 धावांनी पराभव करत मालिकेत 3-0 असा क्लीन-स्वीप केला.