IND vs SA 1st Test Day 1: रोहित शर्मा याचे टेस्टमधील चौथे शतक; शिखर धवन, केएल राहुल यांच्यासह 'या' एलिट यादीत झाला समावेश
रोहित शर्मा (Photo Credits: BCCI-Twitter)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात खेळल्या जाणार्‍या तीन सामन्यांच्या टेस्ट मालिकेच्या पहिल्या सामन्याला आज, बुधवार 2 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. सलामी फलंदाज म्हणून कसोटी सामन्यात प्रथमच वनडे आणि टी-20 चा स्फोटक फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याला सलामीला मैदानात उतरवण्याचा निर्णय भारताने घेतला. आणि रोहितने तो योग्य सिद्ध करून दाखवला. सलामी फलंदाज म्हणून पहिल्या सामन्यात रोहितने स्वत: ला सिद्ध करत शानदार शतक पूर्ण केले आहे. या सामन्यात रोहितने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. हा सामना पाहता असे म्हणता येईल की रोहितच्या रूपात कसोटीत भारतालाही एक विश्वासार्ह आणि धोकादायक फलंदाज सापडला आहे. दरम्यान, आजच्या मॅचमध्ये शतक करत रोहितचा अनेक दिग्गजांच्या यादीत समावेश झाला आहे. (IND vs SA 1st Test Day 1: रोहित शर्मा याने केली राहुल द्रविड ची बरोबरी, ओपनर म्हणून पहिल्या अर्धशतकाचे Twitter वर कौतुक)

रोहितने 154 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. यासह रोहित, शिखर धवन (Shikhar Dhawan), केएल राहुल (KL Rahul), पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यासारख्या फलंदाजांच्या यादीत सहभागी झाला आहे. सलामीवीर म्हणून त्याच्या पहिल्या डावात 100 धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. धवनने 2012-2013 मध्ये मोहाली येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीवीर म्हणून शतक झळकावले होते. यंदाच्या मालिकेमधून वगळण्यात आलेल्या राहुलनेदेखील सलामीवीर म्हणून पहिल्या डावात शतक झळकावले होते. 2014-15 मध्ये राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी क्रिकेट मैदानावर 110 धावा केल्या होत्या. आणि मागील वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध राजकोटमध्ये सलामीवीर म्हणून शतक ठोकणारा पृथ्वी शॉ तिसरा फलंदाज होता.

शिवाय, ओपनर म्हणून पहिल्याच मॅचमध्ये शानदार फलंदाजी करत होम ग्राऊंडवर खेळताना रोहितच्या फलंदाजीची सरासरी सर्वाधिक झाली आहे. रोहितने भारतात खेळताना90 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. दुसरीकडे, सध्या रोहितने मयंक अग्रवाल यांच्यासाथीने द्विशतकी भागीदारी केली आणि भारताला मजबूत स्थितीत नेले आहे. मयंकने 84 धावा केल्या आहेत आणि साध्य तो खेळपट्टीवर रोहितला चांगली साथ देत आहे.