रोहित शर्मा (Photo Credits: BCCI-Twitter)

वनडे आणि टी -20 क्रिकेटमधील जगातील सर्वात धोकादायक फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आता कसोटी क्रिकेटमधील आपल्या नव्या प्रवासावर निघाला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ही पहिलीच वेळ होती जेव्हा रोहितने डावाची सुरुवात केली आणि त्याने आतापर्यंत संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय अगदी बरोबर सिद्ध केला आहे. लंच ब्रेकपर्यंत भारताने विकेट न गमावता 91 धावा केल्या असून रोहित शर्मा सध्या 84 चेंडूत 52 धावा करून खेळपट्टीवर खेळत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून पहिल्या डावात रोहितने टीकाकारांना योग्य उत्तर दिले ज्यांना वाटते की तो कसोटी क्रिकेटपटू नाही. सलामी फलंदाज म्हणून रोहितने पहिले अर्धशतक केले आणि माजी महान टेस्टपटू, 'द वॉल' राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची बरोबरी केली. (IND vs SA 1st Test Day 1: ओपनिंगला येत रोहित शर्मा ने केले पहिले अर्धशतक, Lunch पर्यंत टीम इंडियाने केल्या 91 धावा)

लंच ब्रेकपर्यंत रोहितने पाच चौकार आणि दोन षटकार लगावले. रोहितने भारतीय क्रिकेटपटूंमध्ये घरच्या मैदानावर सलग पन्नास पेक्षा अधिक धावा करण्याच्या बाबतीत द्रविडची बरोबरी केली. द्रविडने 1997-1998 मध्ये सलग सहा वेळे पन्नास किंवा अधिक धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ११ वे अर्धशतक रोहितचे सहावे होते. 2016-2019 दरम्यान रोहितचे हे सहावे अर्धशतक आहे. या खेळीमुळे रोहितचे चाहते खूप खुश आहेत, एवढेच नव्हे दिग्गजांनी देखील रोहितचे ट्विटरवर कौतुक केले आहेत. रोहितच्या पन्नाशीनंतर हर्षा भोगले, ब्रॅड हॉग आणि अन्य दिग्गजांनी कौतुकाने रोहितची पाठ थोपटली.

रोहित शर्मा

रोहित आणि राहुल द्रविड 

पहा सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया:

रोहित शर्माने अर्धशतक केले जे त्याच्यासाठी नक्कीच खूप महत्वपूर्ण असेल

ज्याने त्याला इतके दिवस कसोटी संघाबाहेर ठेवले, केवळ रोहितच नाही तर भारताचेही नुकसान झाले

भारताला कसोटी सलामीवीर आवश्यक आहे, निवडकर्ते घाबरले होते की रोहित शर्मा हे करू शकला असता, पण तो आला आहे, अशी आशा करूया की तो येथेच राहील

दक्षिण आफ्रिकेचा संघ या मालिकेसह आयसीसी कसोटी चँपियनशिपच्या मोहिमेची सुरुवात करीत आहे. सामना जिंकत आघाडी मिळवण्याकडे दोन्ही संघांचे लक्ष लागून आहे. यापूर्वी, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली होती. दक्षिण आफ्रिकविरुद्ध ओपनर म्हणून रोहितने त्याच्या डावाची सुरुवात चौकारासह केली. डावाची दुसरी ओव्हर आफ्रिकेचा तडाकेदार कागिसो रबाडा याने टाकली. रबाडाचा पहिला चेंडू रोहितने सोडला आणि दुसरा चेंडू त्याने थोडा शॉर्ट टाकला रोहितने थर्ड मॅन आणि पॉईंटच्या दरम्यान कट मारला आणि चेंडू सीमा रेषे बाहेर गेला. अशा प्रकारे रोहितने आपल्या नवीन कसोटी डावाला सुरुवात केली.