IND vs SA: ‘देशासाठी...’, 200 कसोटी विकेट पूर्ण केल्यानंतर Mohammed Shami झाला भावूक, दिवंगत वडिलांच्या आठवणीने डोळे पाणावले (Watch Video)
मोहम्मद शमी (Photo Credit: PTI)

यजमान दक्षिण आफ्रिकाविरुद्ध (South Africa) सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क येथे सुरु असलेल्या पहिल्या बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ज्येष्ठ भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) कमाल कामगिरी केली. शमीने पहिल्या डावातच पाच विकेट्स घेतल्या आणि यासह त्याने कसोटी क्रिकेटमधील 200 विकेट पूर्ण केले. या महान कामगिरीवर शमी देखील भावूक झाला आणि आपल्या दिवंगत वडिलांच्या आठवणीने त्याचे डोळे भरून आले. सेंच्युरियनमध्ये (Centurion) 200 कसोटी बळी घेणारा 5वा भारतीय वेगवान गोलंदाज बनल्यानंतर शमीने आपल्या वडिलांच्या पाठिंब्याची आठवण केली. कठीण परिस्थितीत वडिलांच्या पाठिंब्याशिवाय आपले स्वप्न साकार होऊ शकले नसते यावर भर देत शमीने सुपरस्पोर्ट पार्क येथे ऐतिहासिक दिवशी भावनिक श्रद्धांजली वाहिली. देशासाठी खेळ खेळून जे यश मिळते, तेच त्याच्यासाठी पुरेसे आहे, असे शमी म्हणाला. आणि येत्या सामन्यातही चांगली कामगिरी करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. (IND vs SA 1st Test Day 3: मोहम्मद शमीचा ‘पंच’, कगिसो रबाडाची शिकार करून पूर्ण केल्या 200 कसोटी विकेट)

कपिल देव आणि जवागल श्रीनाथ यांच्यानंतर कसोटी विकेटचे द्विशतक करणारा शमी भारताचा तिसरा वेगवान गोलंदाज ठरला. तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर BCCI.TV वर गोलंदाजी प्रशिक्षक पारस महांबरे यांच्याशी बोलताना शमीने आनंदाचा क्षण शेअर केला. “माझ्या वडिलांनी मला घडवले आहे की मी आज आहे. मी अशा गावातून आलो आहे जिथे जास्त सुविधा नाहीत आणि आजही सर्व सुविधा उपलब्ध नाहीत. तरीही, माझे वडील मला कोचिंग कॅम्पमध्ये घेऊन जाण्यासाठी 30 किमी सायकल चालवायचे. आणि तो संघर्ष मला अजूनही आठवतो. त्या दिवसांत आणि त्या परिस्थितीत त्यांनी माझ्यामध्ये गुंतवणूक केली आणि मी सदैव कृतज्ञ आहे,” शमीने मंगळवारी पत्रकारांना सांगितले. याशिवाय 200 विकेट्सच्या कामगिरीवर बोलताना वरिष्ठ वेगवान गोलंदाज पुढे म्हणाला: “तुम्ही रँकमध्ये येत असताना आणि छाप पाडण्यासाठी संघर्ष करत असताना तो शेवटी काय साध्य करू शकतो याचे स्वप्न कोणीही पाहू शकत नाही. तुमचे स्वप्न भारताचा खेळाडू बनण्याचे आणि ज्यांना तुम्ही टीव्हीवर पाहिले आहे त्यांच्यासोबत खेळायचे आहे.”

लक्षात घ्यायचे की शमीचे वडील तौसीफ अली यांचे जानेवारी 2017 मध्ये निधन झाले होते. शमीने दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात 5 विकेट घेत 200 विकेट पूर्ण केले, त्यानंतर ही त्याच्यासाठी मोठी उपलब्धी होती. विशेष म्हणजे त्याने भारतासाठी कसोटीत सर्वात कमी चेंडू टाकून ही कामगिरी केली आहे. शमीने 200 विकेट घेण्यासाठी केवळ 9896 चेंडू टाकले आहेत. 31 वर्षीय शमीने आपल्या भेदक गोलंदाजीने तिसऱ्या दिवशी आफ्रिकन फलंदाजांना खूप त्रास दिला.