(Photo Credit: Getty)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ दीडशे धावांची आघाडी मिळवून मजबूत स्थितीत आला आहे. टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने दुसऱ्या डावातही अर्धशतक ठोकले आहे. दुसरीकडून, चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) त्याला साथ देत राहिला. एकीकडे रोहित मोठे आक्रमक शॉट्स खेळात होता, तर पुजारा एक धाव घेत रोहितला स्ट्राईक देत होता. रोहित पाठोपाठ पुजाराने देखील अर्धशतक पूर्ण केले. हे पुजाराचे यंदाच्या मालिकेतील पहिले अर्धशतक आहे. पहिल्या डावात पुजारा फक्त 6 धावांवर बाद झाला होता. हे दोन्ही खेळाडू टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभी करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण नुकत्याच सामन्यात रोहितने खेळपट्टीवर अपशब्द बोलले जे स्टंप माइकमध्ये कैद झाले. (IND vs SA 1st Test 2019: क्विंटन डी कॉक याच्या शतकी खेळीबाबत जोफ्रा आर्चर याने 5 वर्षांपूर्वी केली होती भविष्यवाणी? पहा हे Tweet)

भारताच्या दुसऱ्या डावातील 26 व्या ओव्हरमधील दुसर्‍या चेंडूवर रोहितला कवर एरियामधून धाव घ्यायची होती. पण, पुजाराने धावण्यास नकार दिला. त्यानंतर रोहितला पुन्हा क्रीजवर जावे लागले. पण धावा न घेतल्याबद्दल संतापलेल्या रोहितने स्टम्प मीकाकडे लक्ष न देता पुजाराला काही अपशब्द बोलले. आणि आता याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, रोहितने पहिल्यांदा टेस्टमध्ये भारतीय संघासाठी डावाची सुरुवात केली आ. या कसोटीत त्याने अतुलनीय फलंदाजी केली असून सामन्यात आतापर्यंत 225 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने कसोटीच्या पहिल्या डावात 176 धावा केल्या ज्यानंतर दुसऱ्या डावात अर्धशतकाची नोंद केली आहे. या मॅचच्या सुरुवातीस भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 502 धावांची भव्य धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 431 धावांत संपुष्टात आला.