रोहित शर्मा (Photo Credits: BCCI-Twitter)

विशाखापट्टणम मध्ये दक्षिण आफ्रिके (South Africa) विरुद्धची पहिली कसोटी सामना रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि त्याच्या चाहत्यांसाठी खूपच संस्मरणीय आहे. मर्यादित षटकांचा उपकर्णधार रोहित पहिल्यांदाच टेस्ट क्रिकेटमध्ये संघासाठी डावाची सुरुवात करण्यासाठी आला. आणि पहिल्याच डावात दीडशे धावा केल्या. आणि आता दुसऱ्या सामन्यातदेखील रोहितने शतकी खेळी केली आहे. रोहितने 133 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या आहेत. सलामीवीर म्हणून पहिल्या सामन्याच्या दोन्ही डावात शतक करणारा रोहित जगातील पहिला खेळाडू बनला. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा त्याने सलामीवीर म्हणून 176 धावांचा डाव केला. 244 चेंडूत 176 धावांचे शतक झळकावत त्याने 23 चौकार आणि 6 षटकार ठोकले. यानंतर त्याने दुसऱ्या डावातही तसाच खेळ सुरु ठेवला आणि चेंडूत सलामीला येत दुसरे शतक पूर्ण केले. टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात रोहितने केवळ अर्धशतक केले आणि भारतीय कसोटी इतिहासात कोणीही करू शकत नाही असा रेकॉड आपल्या नावावर केला.  (IND vs SA 1st Test Day 4: मॅच दरम्यान चेतेश्वर पुजारा वर भडकला रोहित शर्मा, मैदानात केलेली शिवीगाळ स्टम्प माइकमध्ये कैद, पहा Video)

भारताच्या दुसऱ्या डावात 20 व्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर रोहितने डॅन पिआट (Dane Piedt) याच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला आणि पंचवीस वर्षांपूर्वी एका कसोटीत एका भारतीय फलंदाजाच्या सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडला. आतापर्यंत सामन्यात 10 षटकार ठोकले आहेत. रोहितच्या आधी ही कामगिरी नवजोत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी 1994 मध्ये लखनौमध्ये श्रीलंकेविरूद्ध केली होती. सिद्धूने त्या सामन्याच्या डावात 8 षटकार ठोकले होते. आणि रोहित आता वनडे, टी-20 आणि टेस्ट मध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा पहिला फलंदाज आहे. याआधी पाकिस्तानच्या वासिम अक्रम (Wasim Akram) यांनी 1995 मध्ये त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या डावात 12 षटकार ठोकले. याशिवाय, घरच्या कसोटींमध्ये सलग 50 पेक्षा अधिक धावा करणारा रोहित पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. रोहितने मागील ७ (होम) टेस्ट सामन्यात: 82, 51 (नाबाद), 102 (नाबाद), 65,50 (नाबाद), 176,50 (नाबाद) अशा धावा केल्या आहेत.

रोहित भारतीय भूमीवर

रोहितने दुसऱ्या डावात 133 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. या काळात मजबूत खेळाडूचा स्ट्राईकरेट 75.19 होता. शॉर्ट फॉर्मेटचा सर्वात धोकादायक फलंदाज रोहितचे हे कसोटी क्रिकेटमधील पाचवे शतक आहे. रोहितने ही पाची शतकं भारतीय भूमीवर झळकावली आहेत.