IND vs SA 1st Test Day 2: दुसऱ्या दिवशी टीम इंडियाला Advantage, दक्षिण आफ्रिकाने 39 धावांवर गमावले 3 विकेट्स
रोहती शर्मा, मयंक अग्रवाल (Photo Credit: Getty)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये यजमान संघाने आपले वर्चस्व बनवून ठेवले आहेत. दुसऱ्या दिवशी भारताने 7 बाद 502 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. मयंक अग्रवाल (Maynak Agrawal) याने 215 धावा केल्या, तर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने पहिले टेस्ट दुहेरी शतक हुकले आणि हिटमॅन 176 धावांवर बाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकाने 3 विकेट गमावत 39 धावा केल्या. सध्या डीन एल्गार आणि टेंबा बावुमा खेळत आहे. रवींचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने 2 विकेट्स घेतल्या आणि संघाला लवकर यश मिळवून दिले. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने 1 गडी बाद केला. जडेजाने डेन पायटेड याला शून्यावर बाद केले. (IND vs SA 1st Test Day 2: रोहित शर्मा याने केली ऐतिहासिक खेळी; विराट कोहली याने केले असे काही ज्याने चाहते झाले खुश Video)

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये कर्णधार विराट कोहली याने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने टेस्टमध्ये पहिल्यांदा रोहितला सलामीला पाठवले. केएल राहुल याच्या सतत अपयशामुळे रोहितला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. रोहितने मिळालेल्या संधीचा चांगला फायदा घेत दीडशे धावा केल्या आणि सलामीसाठी आपली दावेदारी पेश केली. पहिल्या दिवशी आफ्रिकी गोलंदाजांना एकी विकेट घेता आली नाही. पहिल्या दिवशी रोहितने शतक आणि मयंकने अर्धशतक केले होते.

दुसऱ्या दिवशीदेखील रोहित आणि मयंकने शानदार फलंदाजी सुरूच ठेवली. रोहित दीडशेचा टप्पा पार करत बाद झालं तर त्याच्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारा याला काही प्रभाव पडता आला नाही आणि 6 धावांवर बाद झाला. रोहित आणि मयंकने दुसऱ्या दिवशी शानदार खेळी केली आणि रेकॉर्ड 317 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर मयंकने देखील दीडशेचा टप्पा गाठला. पुजारानंतर फलंदाजीसाठी आलेला विराट कोहली 20 धावा करून माघारी परतला. उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने 15 धावा केल्या. आफ्रिकेसाठी केशव महाराज याने 3 गडी बाद केले. डील एल्गार याने मयंकची विकेट घेतली आणि संघाला मोठे यश मिळवले. मयंकच्या बाद झाल्यावर अन्य भारतीय फलंदाज मोठे शॉट्स मारण्याच्या नादाद बाद झाले. वर्नोन फिलैंडर याने पुजाराला माघारी धाडले आणि डेन पायड याने साहाला बाद केले.