IND vs PAK, T20 World Cup 2021: आयसीसी टी-20 विश्वचषक सुपर 12 राउंडची सुरुवात झाली आहे. आज भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. या सामन्याची क्रिकेट चाहते विशेषतः दोन्ही देशातील चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. हे दोन्ही संघ फक्त आयसीसी (ICC) स्पर्धांमध्येच आमनेसामने येतात. दोन्ही संघांमधील आजचा आर-पारचा हा सामना दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून खेळला जाईल. विशेष म्हणजे सुपर-12 टप्प्यातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा पहिला सामना आहे. दोन्ही संघ गट 2 चा भाग आहेत. 5 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. ही स्पर्धा अखेर भारतात 2016 मध्ये आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये वेस्ट इंडीज संघ दुसऱ्यांदा चॅम्पियन बनला होता. यंदा टी-20 विश्वचषकात भारताचे युवा खेळाडू पाकिस्तानची नौका डुबवण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. टीम इंडियाला यावेळी टी-20 विश्वचषक जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. (T20 WC 2021, IND vs PAK: भारत-पाकिस्तान लढतीपूर्वी माजी टीम इंडिया दिग्गजचा विराटसेनेला ‘छोटा सल्ला’ - ‘याला युद्ध नव्हे तर...’)
आयसीसीने विराट कोहलीची टीम इंडिया आणि बाबर आजमच्या ‘मेन इन ग्रीन’ संघाला सुपर-12 च्या एकाच गटात ठेवले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही संघात द्विपक्षीय मालिका खेळली जात नसल्याने फक्त आयसीसी व आशियाई स्पर्धेत सामना खेळतात. आयसीसी स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान सामना नेहमीच हाय-व्होल्टेजचा असतो. वनडे वर्ल्ड कपप्रमाणेच टी-20 मधेही भारताचा पाकिस्तानवर नेहमीच वरचष्मा राहिला आहे. आजच्या या महत्वपूर्ण सामन्यात सर्वांच्या नजरा या खेळाडूंवर असतील...
रोहित शर्मा (Rohit Sharma)
रोहित शर्मा टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू सिद्ध होऊ शकतो. रोहितने टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक विश्वविक्रम आपल्या नावावर केले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये रोहितची कामगिरी देखील खूप चांगली झाली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 111 सामन्यांच्या 103 डावांमध्ये 2864 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 4 शतके आणि 22 अर्धशतके केली आहेत.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)
सूर्यकुमारने यंदा इंग्लंडविरुद्ध घरच्या मालिकेतून संघात पदार्पण केले होते. टी-20 विश्वचषकात सूर्यकुमार चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. सूर्याने केवळ 4 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 170 च्या आसपासच्या सरासरीने 139 धावा केल्या आहेत. सूर्याचा फॉर्म सध्या टीमसाठी चिंतेचा विषय असलात तरी टी-20 विश्वचषकात सर्वांच्या नजरा त्याच्यावर असतील.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवर गोलंदाजीची संपूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावर असेल. बुमराह टी-20 क्रिकेटचा अतिशय किफायतशीर गोलंदाज आहे. बुमराहने टी-20 मध्ये आतापर्यंत 59 विकेट घेतल्या आहेत. अशा स्थितीत टी-20 विश्वचषकात तो चेंडूने विरोधी संघाच्या अडचणीत वाढ करू शकतो.