India A Cricket Team vs Pakistan A Cricket Team Emerging Asia Cup 2024: इमर्जिंग आशिया कप 2024 (Emerging Asia Cup 2024) आजपासून सुरू होत आहे. बांगलादेश अ आणि हाँगकाँग अ यांच्यातील पहिला सामना दुपारी 12.30 वाजता सुरू होईल. या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व तिळक वर्मा (Tilak Verma) करत आहेत, जो भारतीय राष्ट्रीय संघाकडून टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळला आहे. भारताला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध (IND A vs PAK A) खेळायचा आहे. दोन्ही संघांमधला हा शानदार सामना उद्या म्हणजेच 19 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. इमर्जिंग आशिया कप 2024 मध्ये एकूण 8 संघ सहभागी होत आहेत, ज्यांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
अ गट- अफगाणिस्तान अ, बांगलादेश अ, हाँगकाँग अ, श्रीलंका अ
ब गट- पाकिस्तान अ, भारत अ, ओमान, यूएई
ICYMI!
A look at the Tilak Varma-led India 'A' squad for the upcoming ACC Men's T20 Emerging Teams Asia Cup 2024 👌👌#TeamIndia pic.twitter.com/5GWFZB6gU9
— BCCI (@BCCI) October 14, 2024
इमर्जिंग आशिया कप 2024 साठी घोषित केलेल्या संघाचे नेतृत्व टिळक वर्मा करत आहेत. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक युवा खेळाडूंचा या संघात समावेश आहे.
कधी अन् कुठे पाहणार सामना?
भारत विरुद्ध पाकिस्तान 'अ' मधील हा सामना 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे, जो तुम्ही फॅनकोड ॲपवर थेट पाहू शकता. हा सामना Jio Cinema किंवा Disney+ Hotstar वर थेट प्रसारित होणार नाही.
भारत अ संघ
तिळक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा, आयुष बडोनी, निशांत सिंधू, रमणदीप सिंग, अनुज रावत, प्रभसिमरन सिंग, नेहल वढेरा, अंशुल कंबोज, हृतिक शौकीन, आकिब खान, वैभव अरोरा, रसिक सलाम, साई किशोर, राहुल चहर.
पाकिस्तान अ संघ
मोहम्मद हारिस (कर्णधार), अब्बास आफ्रिदी, कासिम अक्रम, अहमद दानियाल, शाहनवाज दहनी, मोहम्मद इम्रान, हसिबुल्ला खान, यासिर खान, जमान खान, अराफत मिन्हास, सुफियान मोकीम, मेहरान मुमताज, अब्दुल समद, ओमिर युसूफ.