IND vs NZ: खराब फॉर्ममुळे Ajinkya Rahane याच्या हातून जाणारा टेस्ट उपकर्णधारपद? ‘हे’ 2 धाकड बनू शकतात प्रबळ दावेदार
अजिंक्य रहाणे (Photo Credit: PTI)

Ajinkya Rahane Vice-Captain Replacement: भारत कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सध्या खराब फॉर्मशी संघर्ष करत आहे. आणि यामुळेच त्याच्यावर टीका करण्यात येत आहे. कानपूर कसोटीत विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीत त्याने संघाची कमान सांभाळली होती. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिला कसोटी सामना खेळून विराट कोहली परतला तेव्हा देखील रहाणेने संघाचे नेतृत्व केले होते. मात्र, मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) सुरु असलेल्यादुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले होते. यामुळे पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) आपला पहिला टेस्ट सामना खेळण्यापासून वंचित राहिला. बीसीसीआयने (BCCI) सामन्यापूर्वी सांगितले की त्याच्या स्नायूंमध्ये ताण आहे आणि त्यामुळेच तो या सामना खेळणार नाही. रहाणेचा खराब फॉर्म त्याच्यासाठी आपत्ती ठरत आहे. त्यामुळे त्याचे उपकर्णधारपदही धोक्यात आले आहे. (IND vs NZ: कर्णधार Virat Kohli कडून उपकर्णधार अजिंक्य राहणेची पाठराखण, म्हणाला - ‘त्याने कानपूरमध्ये जे काही करता येईल ते केले’)

रहाणेचे उपकर्णधारपदही धोक्यात असल्याचे पीटीआय या वृत्तसंस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. पीटीआयने आपल्या वृत्तानुसार खराब फॉर्ममुळे रहाणेला न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत अंतिम-11 मध्ये स्थान मिळाले नाही आणि त्यामुळे त्याच्या कसोटी संघाचा उपकर्णधार पदही अडचणीत आले आहे. केएल राहुल आणि रोहित शर्मा यांचे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघात  पुनरागमन करणे अपेक्षित आहे. यादरम्यान शुभमन गिल, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर यांनीही धावा केल्या आहेत, ज्यामुळे रहाणेला आता जागेसाठी जोरदार स्पर्धा मिळू शकते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्याची संघात निवड झाली असली तरी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत उपकर्णधारपदाचे दावेदार आहेत टी-20 संघाचे कर्णधार रोहित आणि राहुल बनू शकतात. उल्लेखनीय आहे की राहुल टी-20 संघाचा नवीन उपकर्णधारही आहे.

दरम्यान रहाणे एक फलंदाज म्हणूनही टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. तो धावांसाठी झगडत आहे. इंग्लंडच्या संपूर्ण संपूर्ण दौऱ्यात तो अयशस्वी ठरला होत्या. त्यापूर्वी तो आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यातही धावा करू शकला नाही. त्यापूर्वी इंग्लंडने भारताचा दौरा केला होता. चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेत रहाणेच्या बॅटमधून केवळ एक अर्धशतक झळकले. कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात रहाणेने चांगली सुरुवात केली पण त्याला मोठ्या डावात रूपांतरित करता आले नाही आणि 35 धावा करून तो बाद झाला. त्यानंतर किवींविरुद्ध दुसरा सामना सुरू होण्यापूर्वी रहाणेच्या स्नायूंना दुखापत झाल्याची बातमी आली आणि त्यामुळे तो हा सामना खेळत नाहीये.