IND vs NZ: कर्णधार Virat Kohli कडून उपकर्णधार अजिंक्य राहणेची पाठराखण, म्हणाला - ‘त्याने कानपूरमध्ये जे काही करता येईल ते केले’
अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीत आघाडीचे नेतृत्व करत प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane( बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या मागील आवृत्तीत टीम इंडियाच्या  (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रसिद्ध मालिका विजयाची रचना केली होती. भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात मुंबई (Mumbai) येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला रहाणेच्या नेतृत्व कौशल्यावर प्रकाश टाकत, राहुल द्रविड-प्रशिक्षित टीम इंडियाने कानपूर (Kanpur) येथे मालिका पहिल्या सामन्यात निराशाजनक बरोबरी साधल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या कर्णधार कोहलीने आपल्या उपकर्णधाराचा बचाव केला. मालिकेतील सलामीच्या सामन्यात मध्यमगती खेळीनंतर, उपकर्णधार रहाणेला टीकेचा सामना करावा लागला. गुरुवारी दुसऱ्या कसोटीपूर्वी पारंपारिक पत्रकार परिषदेत बोलताना कर्णधार कोहली म्हणाला की रहाणेच्या नेतृत्वात संघाने द्विपक्षीय कसोटी मालिकेची विजयी सुरुवात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. (IND vs NZ 2nd Test Weather Report: मुंबईतील अवकाळी पावसामुळे मालिकेच्या निर्णायक सामन्याच्या सुरुवातीला बसणार फटका?)

“मी सामना पाहिला आणि मला वाटते की आम्ही एक संघ म्हणून जे काही करता येईल ते प्रयत्न केले. साहजिकच प्रत्येकाची गोष्टींकडे जाण्याची पद्धत वेगळी असते,” असे कोहली म्हणाला. “मी त्या परिस्थितीत असतो तर कदाचित मी उत्तर देऊ शकलो असतो पण तसे नाही. मला माहित आहे की संघाने शक्य ते सर्व प्रयत्न केले आणि जिन्क्सने हे सुनिश्चित करण्यासाठी नेहमीच उत्कृष्ट कल्पना आणल्या आहेत, तुम्हाला माहिती आहे. रणनीती, फिल्ड प्लेसिंग आणि गोलंदाजांना फिरवण्याच्या सहाय्याने विरोधक दबावाखाली होते. याचे एक उत्तम उदाहरण ऑस्ट्रेलियात देखील होते जेव्हा आम्ही [तिथे] खेळलो,” कोहलीने सांगितले. दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतील सलामीच्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आलेला कोहलीचा राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.

न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटी सामन्यात भारताच्या संघाला एका विकेटने विजयापासून वंचित राहावे लागले. भारतीय फिरकीपटूंना शेवटची विकेट काढता आली नाही आणि खराब प्रकाशामुळे सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात भारताला विजय मिळवून न दिल्याने रहाणे चाहत्यांच्या निशाण्यावर आला. याशिवाय रहाणे बॅटने खराब फॉर्मशी झुंज देत आहे, जो की चर्चेचा विषय बनला आहे. श्रेयस अय्यरच्या चमकदार कामगिरीनंतर रहाणेलाही मुंबई कसोटीत खेळणे कठीण दिसत आहे.