IND vs NZ 2nd Test Weather Report: मुंबईतील अवकाळी पावसामुळे मालिकेच्या निर्णायक सामन्याच्या सुरुवातीला बसणार फटका?
वानखेडे स्टेडियम (Photo credits: Wikimedia Commons)

IND vs NZ 2nd Test Weather Report: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) भारत (India)-न्यूझीलंड (New Zealand) कसोटी मालिका सध्या बरोबरीत राहिल्यानंतर संघ मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी कंबर कसून तयारी करत आहेत. कानपूरमधील मालिकेतील पहिल्या सामन्यात अनिर्णित राहिल्याने दुसरा सामना जिंकून मालिका काबीज करण्याच्या उद्देशाने दोन्ही संघ वानखेडेच्या मैदानावर उतरेल. मात्र, मुंबईत अवकाळी पावसाने (Mumbai Rains) कसोटी सामन्यावर संकटाचे ढग निर्माण केले आहेत. प्रतिकूल हवामानामुळे दोन्ही संघांना बुधवारी वानखेडे स्टेडियमवरील त्यांचे नियोजित सराव सत्र रद्द करावे लागले. इतकंच नाही तर भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि साबोवतालच्या शहरात येलो अलर्ट जारी केला आहे. खेळाच्या पूर्वसंध्येला काळे ढग कमी होण्याची शक्यता नसल्यामुळे गुरुवारीही पावसाची अपेक्षा केली जाऊ शकते. (IND vs NZ 2nd Test: न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटीसाठी टीम इंडियात होऊ शकतात मोठे बदल, विराट कोहली ‘या’ फलंदाजाचा पत्ता कापणार)

पहिल्या दिवसाच्या खेळावर पावसाचा परिणाम नक्कीच होणार आहे. तथापि, क्रिकेट चाहत्यांसाठी काही चांगली बातमी म्हणजे की केवळ चार दिवसांचा सामना होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पावसामुळे पाहुण्या संघाचे वेगवान गोलंदाज खेळपट्टी आणि मैदानावरील आर्द्रतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. खेळाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी पावसाचा अंदाज 20% असल्यामुळे खेळात सौम्य व्यत्यय येऊ शकतो. मात्र, शनिवारपासून वातावरण पूर्णपणे निरभ्र असण्याची शक्यता आहे. गुरुवारी कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस अपेक्षित असले तरी शुक्रवारी ते 29 अंश सेल्सिअस आणि शनिवारपासून 30 अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामना जसजसा पुढे जाईल तसतशी परिस्थिती आणखी सुधारण्याची अपेक्षा आहे.

त्यामुळे, क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर म्हणजे की खेळादरम्यान पावसाचा फार मोठा फटका बसणार नाही आणि पहिल्या दिवसाव्यतिरिक्त अन्य दिवशी जास्तीत जास्त षटके खेळली जातील. तथापि, वानखेडे स्टेडियममधील ड्रेनेज सुविधेवर बरेच काही अवलंबून असेल कारण गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसानंतर ग्राउंड-मेन किती लवकर मैदान कोरडे करू शकतात हे पाहणे बाकी आहे. गुरुवारी मुंबईत जोरदार पाऊस झाला तर त्याचा परिणाम शुक्रवारी खेळावरही होऊ शकतो. त्यामुळे पावसाचा दोन्ही संघांच्या संयोजनावरही परिणाम होऊ शकतो.