IND vs NZ 2nd Test: पहिल्या कसोटीत दमदार विजयाची संधी गमावल्यानंतर, विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडिया (Team India) वानखेडे स्टेडियमवर ३3डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) मालिका जिंकण्याच्या आशेने मैदानात उतरेल. बायो-बबल थकवा आणि 2021 मध्ये खचाखच भरलेल्या वेळापत्रकामुळे विश्रांती दिल्यानंतर कर्णधार कोहली संघात पुनरागमन करेल. कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना जिंकून जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. याशिवाय न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया कोणत्या कॉम्बिनेशनसह मैदानात उतरणार आहे, याची जोरदार चर्चा सुरू आहे. दुसऱ्या सामन्यात विजयाची नोंद करण्यासाठी टीम इंडियाला मुंबईतील (Mumbai) परिस्थितीनुसार मैदानात उतरावे लागेल, तसेच कोहली पुनरागमन केल्यानंतर एका फलंदाजांचा पत्ता कट होऊ शकतो. (IND vs NZ 2nd Test: कोहलीच्या पुनरागमनाने भारतीय ताफ्यात प्लेइंग XI वर अडकला पेच, Wasim Jaffer ने शेअर केलेले ‘धमाल’ मीम पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट)
संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला बाहेर बसवण्याची सध्या चर्चा सुरू असली तरी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांनी ज्या प्रकारे त्याची पाठराखण केली आहे, त्यावरून तसे वाटत नाही. मात्र, विराटच्या जागी जो फलंदाज प्लेइंग इलेव्हनमधून वगळला जाऊ शकतो तो सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवाल असू शकतो. साहा दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही याबाबतचा निर्णय ऐनवेळी घेतला जाईल असे म्हांबरे यांनी सांगितले होते, मात्र मानेला ताण झाल्यामुळे साहा दुसऱ्या कसोटीतून बाहेर जाऊ शकतो, असे मानले जात आहे. अशा परिस्थितीत श्रीकर भरतला पदार्पणाची संधी मिळू शकते. भारतने मुंबई कसोटीत पदार्पण केल्यास तो शुभमन गिलसह डावाची सुरुवात करू शकतो. कानपूर कसोटीतही साहाच्या जागी पहिल्या डावात विकेटकीपिंगची जबाबदारी भरतने घेतली होती.
दुसरीकडे, मयंक अग्रवालला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले तर चेतेश्वर पुजारा आणि रहाणे पैकी कुणालाही वगळण्याची गरज नाही. मयंकने कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात 13 तर दुसऱ्या डावात 17 धावा केल्या होत्या. याशिवाय श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजाचे मधल्या फळीतील स्थान कायम असेल. तसेच रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल ही फिरकी जोडी पुन्हा एकदा मुंबईत भारतासाठी महत्त्वाची ठरू शकते.
भारताचा संभाव्य इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन), शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, रिद्धिमान साहा/केएस भरत (विकेटकीर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा आणि उमेश यादव.