Ind vs NZ, CWC Semi Final 2019: न्यूझीलंड कडून टीम इंडिया 18 धावांनी पराभूत, किवी गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांची शरणागती
(Photo by Jordan Mansfield/Getty Images)

तिसऱ्यांदा आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक जिंकण्याचे भारतीय संघाचे (Indian Team) स्वप्न न्यूझीलंड (New Zealand) ने भंग केलेत. न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांचा पाठलाग करत टीम इंडिया ला 211 धाव इतकीच मजल मारता आली. न्यूझीलंड दुसऱ्यांदा विश्वचषकच्या फिनालमध्ये पोहचले आहे. 2015 मध्ये देखील ते फायनलमध्ये पोहचले होते मात्र, ऑस्ट्रेलियाकडून त्यांना पराभव पत्कारावा लागला. विश्वचषकमध्ये सुरुवातीपासून तुफान फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी सेमीफायनलमध्ये अक्षरशः गुडघे टेकले. भारताचा निम्मा संघ फक्त 70 धावांवर माघारी परतला. मधल्या फळीत रिषभ पंत (Rishabh Pant), दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांनाही फार काळ खेळपट्टीवर टिकता आलं नाही. (IND vs NZ, World Cup 2019 Semi-Final मॅचमध्ये रोहित शर्मा, के एल राहुल आणि विराट कोहली यांच्या नावावर नकोसा रेकॉर्ड; वाचा पूर्ण Details)

दरम्यान, भारत-न्यूझीलंड विश्वचषक सेमीफायनल सामना सामना मंगळवारी पावसामुळे थांबवण्यात आला होता. मंगळवारी न्यूझीलंडने 46.1 षटकात 5 बाद 211 धावा केल्या होत्या. त्यामुळे आज 46.2 चेंडूपासून न्यूझीलंडचा सामना झाला. किवी संघाने आपल्या 50 ओव्हरमध्ये 8 बाद 239 धावा केल्या. किवी संघासाठी कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) आणि रॉस टेलर (Ross Taylor) यांनी अर्धशतकी खेळी केली. विलियम्सनने 95 चेंडूंत 67 धावा केल्या तर टेलरने 90 चेंडूंत 74 धावा केल्या. तर भारताकडून भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याने 3 विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) , रवींद्र जडेजा (Rvaindra Jadeja)आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

दुसरीकडे, न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांचा पाठलाग करत भारताचे तीन आघाडीचे फलंदाज-रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल राहुल फक्त एक धाव काढून बाद झाले. त्यानंतर दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत संथ खेळी करत असताना कार्तिक 6 धावांवर बाद झाला. त्यानंतर पंतने आणि हार्दिक पंड्या याच्या साथीने चांगली भागिदारी करत असतानाच पंत 32 धावांवर बाद झाला. पंत बाद झाल्यावरमैदानावर आलेल्या एम एस धोनी याला पंड्या जास्त काळ साथ देऊ शकला नाही आणि 32 धावा करत माघारी परतला.

धोनी आणि रवींद्र जडेजा याच्या जोडीने भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण अंतिम 5 ओव्हरमध्ये मोठे शॉट्स मारण्याच्या नादात आपली विकेट गमावून बसले. जडेजा 77 धावा केल्या तर धोनीने 72 चेंडूत 50 धावा केल्या. न्यूझीलंडचा मॅट हेन्री याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या तर ट्रेंट बोल्ट आणि मिशेल सेंटनर यांनी 10 ओव्हरमध्ये 2 गडी बाद केले.