भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात आयसीसी (ICC) विश्वचषकमधील सेमीफायनल मॅच चालू आहे. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत न्यूझीलंडने भारतीय फलंदाजानंसमोर जिंकण्यासाठी 50 ओव्हरमध्ये 240 धावांचे आव्हान ठेवले. या लक्षाचा पाठलाग करत भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. टीमचे आघाडीचे तीन फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma), के एल राहुल (KL Rahul) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) 1 धाव करत माघारी परतले. भारताला पहिला धक्का रोहितच्या रूपात लागला. न्यूझीलंडच्या मॅट हेन्री (Matt Henry) याने रोहित आणि राहुल या फलंदाजांना बाद करत टीमला मोठे यश मिळवून दिले. तर ट्रेंट बोल्ट (Trent Boult) याने कोहलीला माघारी धाडले. (IND vs NZ, World Cup Semi-Final 2019: रिषभ पंत याची विकेट पडताच कोच रवी शास्त्री वर चिडला विराट कोहली, Netizens ने ट्विट करत दिल्या प्रतिक्रिया)
दरम्यान, आपल्या खराब खेळीच्या जोरावर रोहित, राहुल आणि विराट आणि एक नकोसा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. विश्वचषकाच्या इतिहासात असे पहिल्यांदा झाले की एक संघाचे पहिले तीन फलंदाज एक धावसंख्येवर बाद झाले आहेत.
दुसरीकडे, आपल्या फलंदाजीदरम्यान न्यूझीलंड संघाने देखील एक नकोसा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. यंदाच्या विश्वचषकमध्ये न्यूझीलंडने पहिल्या 10 ओव्हरमध्ये सर्वात कमी रन करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. न्यूझीलंडने पहिल्या 10 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 27 केल्या. त्यामुळे न्यूझीलंडच्या नावे हा रेकॉर्ड झाला आहे. किवी संघासाठी कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) आणि रॉस टेलर (Ross Taylor) यांनी अर्धशतकी खेळी केली. विलियम्सनने 95 चेंडूंत 67 धावा केल्या तर टेलरने 90 चेंडूंत 74 धावा केल्या. तर भारताकडून भुवनेश्वर कुमार याने 3 विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.