विराट कोहली (Virat Kohli) क्रिकेटच्या कोणत्याही स्वरूपात विक्रम मोडण्यास अनोळखी नाही. आणि न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) हॅमिल्टनमधील तिसऱ्या टी-20 सामन्यात तो माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याला एका एलिट यादीत मागे टाकू शकतो. बुधवारी हॅमिल्टन (Hamilton) येथे न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्या टी -20 सामन्यात विराट कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याच्या दृष्टीने धोनीला मागे टाकू शकतो. कोहली टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत धोनीला मागे टाकण्यापासून अवघ्या 25 धावा दूर आहे. सध्या कोहली धोनीच्या मागे चौथ्या क्रमांकावर आहे. धोनीने भारताचा कर्णधार म्हणून 1,112 तर कोहलीने सध्या 1,088 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) 1148 धावांसह दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) 1,273 धावा करून पहिल्या स्थानावर आहे. (IND vs NZ 2020: न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी-20 आधी विराट कोहली याने वर्कआउट दरम्यान केलेला स्टंट एकदा पाहाच, (Video))
विराटने नुकताच टी-20 मध्ये कर्णधार म्हणून सर्वात वेगवान हजार धावा करण्याचा विक्रम केला होता. डु प्लेसिसला पिछाडीवर करत त्याने केवळ 30 डावांमध्ये ही कामगिरी केली. याशिवाय हॅमिल्टनमधील टी-20 सामन्यात आणखी एक अर्धशतक ठोकत कोहली सर्वाधिक अर्धशतकं करणारा कर्णधार बानू शकतो. सध्या कोहलीने विल्यमसन आणि डु प्लेसिससह संयुक्तपणे 8 अर्धशतकं केली आहेत. इतकेच नाही तर कोहलीला आणखी एका विशेष क्लबमध्ये स्थान मिळवण्याची संधी असेल. जर त्याने सात षटकार ठोकले तर टी -20 मध्ये कर्णधार म्हणून 50 षटकार ठोकणारा तो जगातील दुसरा कर्णधार होईल. यापूर्वी इंग्लंडचा इयन मॉर्गन (Eoin Morgan) याने आजवर एकूण 62 षटकार मारले आहेत.
ऑकलंड येथे रविवारी दुसर्या टी-20 सामन्यात 7 गडी राखून भारताने न्यूझीलंडला पुन्हा पराभूत केले आणि मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. आता हॅमिल्टनमधील सामना जिंकून टीम इंडिया मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल, तर यजमान किवी मातीत आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील.