IND vs NZ 2020: न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी-20 आधी विराट कोहली याने वर्कआउट दरम्यान केलेला स्टंट एकदा पाहाच, (Video)
विराट कोहली (Photo Credit: Instagram)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) मधील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. ऑकलँडच्या ईडन पार्क येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन टी-20 सामन्यात भारताने जबरदस्त विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या मालिकेचा तिसरा सामना बुधवारी, 29 जानेवारी हॅमिल्टनच्या सीडेन पार्क येथे खेळला जाणार आहे. तिसरा टी-20 सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत अजिंक्य आघाडी मिळविण्याच्या विचारात असेल, तर न्यूझीलंड मालिकेत आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यासाठी टीम इंडिया हॅमिल्टनला पोहचली आहे आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने तयारीदेखील सुरु केली आहे. संघही कठोर परिश्रम घेत आहे. कर्णधार कोहली जिममध्ये घाम गाळत आहे. कोहलीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरून त्याच्या कसरतचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विराट वर्कआउटसह स्टंटही करताना दिसत आहे. (Video: हॅमिल्टन पोहचली टीम इंडिया, युजवेंद्र चहल याने प्रवासादरम्यान एमएस धोनी च्या सन्मानार्थ टीम बसमधील 'या' कामाचा केला खुलासा)

भारतीय कर्णधार फिटनेसबाबत खूप सतर्क असतो. तो स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी कठोर कसरत करतो आणि इतरांनाही प्रेरित करतो. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये विराट जिममध्ये कसरतसह स्टंट करताना दिसत आहे. वर्कआउट दरम्यान कोहलीने स्टंटही केले आहेत. विराट जमिनीवरून दोन बॉक्सच्या वर उडी मारत आहे. विराटच्या या पोस्टवर यूजर्सने बर्‍याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. हरभजन सिंह नेही विराटच्या या स्टंटचे कौतुक केले आहे. पाहा हा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

Putting in the work shouldn't be a choice, it should be a requirement to get better. #keeppushingyourself

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर भारत-न्यूझीलंड 3 वनडे आणि 2 टेस्ट मालिकेत आमने-सामने येतील. वनडे मालिकेतील तिन्ही सामने 5 फेब्रुवारी, 8 फेब्रुवारी आणि 11 फेब्रुवारी रोजी खेळले जातील. यानंतर 21 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. हे दोन्ही सामने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असेल.