जयंत यादव (Photo Credit: PTI)

स्पिनर जयंत यादव (Jayant Yadav) फेब्रुवारी 2017 नंतर प्रथमच भारतीय कसोटी संघात (India Test Team) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या दुसऱ्या कसोटीसाठी परतला आहे. जयंतने अखेर 2017 मध्ये पुण्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतासाठी शेवटची कसोटी सामना खेळला होता. भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळला जात असून अष्टपैलू रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडला आहे. जडेजाच्या जागी संघात आलेला जयंत यादव चार वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन करत आहे, तेही त्याच मैदानावर जिथे त्येनं आपली प्रतिभा दाखवून इतिहास रचला होता. भारताने शेवटचा वानखेडेवर कसोटी सामना खेळला तेव्हा जयंतने ऐतिहासिक शतक झळकावले होते. त्याने चौथ्या कसोटीत 204 चेंडूत 104 धावा केल्या आणि कर्णधार विराट कोहलीसोबत नवव्या विकेटसाठी 241 धावांची भागीदारी केली. जयंत कसोटी सामन्यात 9व्या क्रमांकावर भारयासाठी शतकी खेळी करणारा पहिलाच खेळाडू होता. (IND vs NZ 2nd Test: कमबॅक सामन्यात विराट कोहलीने जिंकला दुर्मिळ टॉस, Wasim Jaffer ने भन्नाट Meme शेअर करून घेतली फिरकी)

न्यूझीलंड मालिकेसाठी संघ जाहीर झाला तेव्हा जयंतचे नाव संघात होते. तथापि जडेजा, आर अश्विन आणि अक्षर पटेल देखील संघात असल्यामुळे जयंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे कठीण होते. या तिघांपैकी कुणालाही दुखापत झाल्याने त्याचा मार्ग मोकळा होऊ शकला असता आणि तसे घडले, ते देखील मुंबईमध्ये. मुंबई आणि जयंत यांचे विशेष नाते आहे आणि चार वर्षानंतर त्याच मैदानावर तो परतत आहे. चार वर्षांपूर्वी याच मैदानावर त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील एकमेव शतक झळकावले होते. या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने जबूत धावसंख्या गाठली. त्यानंतर भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 36 धावांनी पराभव केला. त्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 400 धावा केल्या होत्या.

चार वर्षांपूर्वीच्या सामन्याबद्दल बोलायचे तर सलामीवीर मुरली विजयने 136 धावा, तर कर्णधार विराट कोहलीने शानदार द्विशतक झळकावून 235 धावा ठोकल्या होत्या. जयंत नवव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता आणि त्याने कर्णधार विराटसोबत नवव्या विकेटसाठी 241 धावांची भागीदारी करून 104 धावा चोपल्या होत्या. अशा स्थितीत आता चार वर्षानंतर पुन्हा आपल्या मैदानावर पुनरागमन करणारा जयंत किवींविरुद्ध पुन्हा जुना प्रभाव पाडण्यात यशस्वी होतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.