रोहित शर्मा आणि केएल राहुल (Photo Credit: PTI)

IND vs NZ 2nd T20I 2021: न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) टी-20 मालिकेत टीम इंडियाने (Team India) आपली घोडदौड सुरु ठेवली आणि रांची (Ranchi) येथे दुसऱ्या सामन्यात विजयासह तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली. मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात किवी संघाने पहिले फलंदाजी करून भारतापुढे 154 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाने केएल राहुल (KL Rahul) आणि कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) दमदार अर्धशतकांच्या जोरावर 17.2 षटकात 3 विकेट गमवून सध्य केले. उल्लेखनीय आहे की रांची येथे भारताचा हा तिसरा टी-20 सामना असून त्यांनी मागील दोन असे एकूण तीनही सामने जिंकले आहेत. भारताच्या या मालिका विजयात राहुलसह गोलंदाजांनीही निर्णायक भूमिका बजावली. शिस्तबद्ध खेळी करून गोलंदाजांनी किवी संघाला मोठी धावसंख्या गाठू दिली नाही. दुसरीकडे, किवी संघासाठी कर्णधार टिम साउदीने (Tim Southee) सर्व तीन विकेट घेतल्या. (IND vs NZ 2nd T20I: हर्षल पटेल टी-20 आंतरराष्ट्रीय डेब्यू करणारा भारताचा 6वा वयस्कर खेळाडू, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक यादीत अव्वल)

रांचीच्या JSCA क्रिकेट स्टेडियमवर धावांचा पाठलाग करताना सलामीवीर केएल राहुलने स्थिर सुरुवात करून दिली. राहूल आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात सलामीची 117 धावांची भागीदारी झाली.  राहुलने 49 चेंडूत 65 धावा केल्या. तसेच रोहित शर्मा 36 चेंडूत 55 धावा आणि व्यंकटेश अय्यर 12 धावा करून नाबाद परतला. मालिकेच्या निर्णायक सामन्यात रोहितच्या ‘हिटमॅन’ आर्मीने सुरुवातीपासून आपला दबदबा कायम ठेवला. याची सुरुवात टॉसपासून झाली. नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा भारताला बाजूने लागला आणि त्यांनी किवी संघाला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. डॅरिल मिशेल आणि मार्टिन गप्टिल यांनी आक्रमक सुरुवात केली. पण संघाला नियमित ऍबटरबे दग्ज्जे वसंत असल्यामुळे टीम आव्हानात्मक धावसंख्या उभारू शकली नाही. गेल्या सामन्यातील अर्धशतकवीर गप्टिल आणि मार्क चॅपमन देखील प्रभावी डाव खेळण्यात अपयशी ठरले. पाहुण्या संघासाठी ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 34 धावा ठोकल्या. अशाप्रकारे खेळाडूंच्या छोटेखानी योगदानामुळे न्यूझीलंडचा डाव 6 बाद 153 धावांवर संपुष्टात आला.

प्रत्युत्तरात केएल राहुल आणि रोहित शर्माच्या जबरदस्त सुरुवातीमुळे टीम इंडियाने धावसंख्येचा पाठलाग करत एकतर्फी सामना जिंकला. किवी खेळाडूंनी फिल्डिंग दरम्यान उत्कृष्ट प्रयत्न दाखवले. पण गोलंदाज विकेट घेण्यात अपयशी ठरल्यामुळे संघाला अखेरीस पराभवाचे तोंड पहायला लागले.