न्यूझीलंड अ (New Zealand A) संघाविरुद्ध दोन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारत अ (India A) संघाचा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) ने 204 धावांची नाबाद खेळी केली आणि सामना ड्रॉ करण्यास महत्वाची भूमिका बजावली. गिलने त्याच्या खेळीत 22 चौकार आणि चार षटकार ठोकले आणि हनुमा विहारी (Hanuma Vihari) याच्या जोडीने न्यूझीलंड अविरुद्ध पहिला अनधिकृत टेस्ट सामना ड्रॉ केला. 60 च्या सरासरीने आणि 70 च्या स्ट्राइक रेटने केवळ 20 सामन्यांतून शुभमनचे हे सहावे प्रथम श्रेणी शतक आहे. सामन्यात भारत पहिल्या डावात फक्त 216 धावा करू शकला आणि तेव्हाही गिल भारत अ 83 धावांची सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्यानंतर न्यूझीलंड अने पहिल्या डावात 562/7 धावा केल्या आणि 346 धावांची आघाडी घेतली. दुसर्या डावात भारत अ संघाने झुंज देत 448/3 धावा केल्या आणि सामना अनिर्णित राहिला. (Video: न्यूझीलंडविरुद्ध अनधिकृत टेस्ट सामन्यात भारत A चा हनुमा विहारी विचित्र पद्धतीने आऊट झालेले पाहून सर्व राहिले अवाक)
दुसरीकडे, न्यूझीलंड अचा यष्टिरक्षक डॅन क्लीव्हर याचे दुहेरी शतक केवळ चार धावांनी हुकले. न्यूझीलंड एने पाच विकेटसाठी 385 धावांपासून खेळ सुरू केला.क्लीव्हरने 111 आणि चॅपमनने 85 धावांनी डाव पुढे नेला. क्लीव्हरने 344 चेंडूत 20 चौकार आणि एका षटकारासह चैपमनने 245 चेंडूंमध्ये 11 चौकार ठोकले. कोल मॅकोन्चीने नाबाद 50 धावा केल्या. भारत अकडून ईशान पोरेलने 90 धावांवर दोन तर संदीप वॉरियरने 91 धावांवर दोन गडी बाद केले. भारताकडून दुसऱ्या डावात शुभमनव्यतिरिक्त प्रियांक पांचाल 115) आणि कर्णधार विहारीने नाबाद 100 धावांचा डाव खेळला.
मागील वर्षी गिलने न्यूझीलंड अ विरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेच्या तिसर्या अनधिकृत कसोटी सामन्यात दुहेरी शतक झळकावले होते. वयाच्या 19 वर्ष आणि 334 दिवसांमध्ये त्याने हे कामगिरी करत दुहेरी शतकी खेळी करणारा सर्वात कमी भारतीय प्रतिनिधी म्हणून कामगिरी केली होती. 2020 मध्ये वयाच्या 20 वर्ष आणि 124 दिवसांत झिम्बाब्वेविरुद्ध बोर्ड अध्यक्ष इलेव्हनविरुद्ध 218 धावा करणारा गौतम गंभीरचा विक्रम त्याने मोडला होता.