भारत (India)-न्यूझीलंड (New Zealand) दरम्यान पहिला कसोटी सामना वेलिंग्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया टॉस गमावून पहिले फलंदाजी करताना अत्यंत निराशाजनक स्थितीत आहे. या सामन्यात मयंक अग्रवाल याच्यासह कर्णधार विराट कोहली ने प्लेइंग इलेव्हनमध्ये युवा सलामी फलंदाज पृथ्वी शॉचा (Prithvi Shaw0 समावेश केला. पण शॉ सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये संघासाठी मजबूत सुरुवात करू शकला नाही. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या पृथ्वीने 14 धावा केल्या. पृथ्वीने पुन्हा एकदा आशादायक सुरुवात झाली आणि तो चांगला खेळताना दिसत होता. पण शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरवर टॉम लाथम (Tom Latham) च्या शानदार कॅचमुळे त्याला चांगली सुरूवात करूनही मोठा डाव खेळता आला नाही. ट्रेंट बोल्ट (Trent Boult) च्या ओवर दरम्यान ही घटना घडली.
शॉला ज्याप्रकारे बोल्टने लाथमकडे कॅच आऊट केले ते पाहून त्याने एखादी योजना बनवून त्याला बाद केल्या सारखे वाटले ज्यात तो यशस्वी ही झाला. बोल्टनेबॅकवर्ड स्क्वेअरवर सर्वोत्तम फिल्डर लाथमला उभे केले आणि मग पृथ्वीला शॉर्ट पीच बॉल टाकला. पृथ्वीने या बॉलला फ्लिक केलं, पण लाथम तिथे उभा होता ज्याने हवेत उडी मारत झेल पकडला. पृथ्वीच शॉर्ट बॉल खेळण्याच्या अस्वस्थतेचं पूर्ण फायदा घेतला. पहिल्या डावातही त्याने 16 धावा केल्या आणि टिम साऊथीच्या चेंडूवर बोल्ड झाला. शॉ दोन डावात अपयशी ठरल्यानंतर काही चाहत्यांनी सराव सामन्यात भव्य फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिल ला त्याच्यापुढे कसोटी संघात समाविष्ट करण्याची मागणी केली. दोन्ही डावांत बोल्टच्या चेंडूवर बाद झलने काही नेटकऱ्यांनी पृथ्वीवर टीकाही केली. पाहा यूजर्सच्या प्रतिक्रिया:
शुभमन गिल का नाही
Why India constantly giving chance to Prithvi Shaw why not shubhman gill
DISAPPOINTING
— Sharik Ali (@SharikThe) February 23, 2020
पृथ्वीच्या जागी शुभमन उत्तम पर्याय
I think Shubman Gill is best option in place of Prithvi Shaw for tests. #starsportsindia #NZvIND
— Vishal Thakur (@VishalT1995) February 23, 2020
पृथ्वी शॉ अयोग्य आहे
Prithvi shaw bhai unfit hai . Dear @BCCI @SGanguly99 please remove Ravi Shastri @RaviShastriOfc because of favoritism in selection.
Shubman gill should be in next test match.
— punter (@djdjftiroeldske) February 23, 2020
पृथ्वीपेक्षा शुभमन चांगली कामगिरी करेल
Shubman Gill will play better than Prithvi Shaw
If he get chance @BCCI @imVkohli @SGanguly99 @ICC @PrithviShaw @RealShubmanGill
— Ankur Solanki (@akrsolanki99) February 23, 2020
डॉन ब्रॅडमननंतर शुभमनची सर्वोत्तम सरासरी
@RealShubmanGill has the 2nd Best FC batting average after sir Don Bradman. and still he's waiting for his International debut
It's strange that India with so much of batting riches could only find someone like Prithvi Shaw who has so many technical flaws in his batting #NZvsIND pic.twitter.com/PCmUXluYUk
— Ashutosh Nevse (@iamAshu_N) February 23, 2020
वेलिंग्टन कसोटीत पृथ्वीला मयंकबरोबर डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. पण दोन्ही डावात त्याला आश्चर्यकारक प्रदर्शन करता आले नाही. या कसोटीपूर्वी टीम इंडियाने न्यूझीलंड इलेव्हनविरुद्ध सराव सामना खेळला होता. ज्यात पृथ्वी पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता. पण दुसऱ्या डावात त्याने उत्तम पद्धतीने 39 धावा केल्या. पृथ्वीच्या अंडर-19 विश्वचषक संघाचा साथीदार शुभमन गिलला वेलिंग्टन टेस्टमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.