भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zelaand) मधील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना वेलिंग्टनमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवसाशी न्यूझीलंडने भारताला 191 धावांवर ऑलआऊट केले. आणि आता त्यांना जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने 4, टिम साऊथीने 5 आणि कॉलिन डी ग्रैंडहोम ने 1 गडी बाद केला. भारताने आज दुसर्या डावात 4 विकेट्ससाठी 144 धावांनी खेळण्यास सुरुवात केली.संघाने खराब सुरुवात केली आणि त्याला सलग दोन धक्के बसले. पहिले अजिंक्य रहाणे (Ajikya Rahane) आणि त्यानंतर हनुमा विहारी (Hanuma Vihar) यांनी विकेट गमावल्या. (Trent Boult) ट्रेंट बोल्ट आणि टिम साऊथी (Tim Southee) यांनी रहाणे आणि विहारीला माघारी धाडले. बोल्टने रहाणेला 29 धावांवर कॅच आऊट केले. रहाणे बाद झाल्यानंतर विहारीही बाद झाला. 69 व्या षटकातील तिसरा चेंडूवर साऊथीने विहारीला बोल्ड केले.
सामन्याच्या तिसर्या दिवशी न्यूझीलंडने पहिल्या डावात 348 धावा केल्या आणि पहिल्या डावाच्या जोरावर भारताविरुद्ध 183 धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात भारताचा संपूर्ण संघ केवळ 165 धावांवर ऑलआऊट झाला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 4 विकेट गमावून 144 धावा केल्या होत्या. तिसर्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, पण फलंदाजांनी पुन्हा निराश केले. दुसऱ्या डावात भारताकडून मयंक अग्रवाल ने 58, अजिंक्य रहाणेने 29 धावा केल्या. दुसर्या डावात पुन्हा एकदा भारतीय फलंदाज अपयशी ठरले. ट्रेंट बोल्ट च्या तुफानी गोलंदाजीसमोर त्याने पहिले चार विकेट 113 धावांत गमावले.
चौथ्या दिवशी भारताला पहिला धक्का अजिंक्य रहाणेच्या रूपात लागला. बोल्टने रहाणेला 29 धावांवर विकेटच्या मागे झेलबाद केले. त्यानंतर हनुमा विहिरीला 15 धावांवर साऊथीने बोल्ड केले. आर अश्विन 4, रिषभ पंत 25, इशांत शर्माने 12 धावा केल्या. पंतसह विकेट सम्भाळून फलंदाजी करणाऱ्या इशांत शर्माला डी ग्रैंडहोमने 21 चेंडूंत 12 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट केले. त्यानंतर पंतही साऊथीच्या शॉर्ट बॉलवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात बोल्टकडे 25 धावा करून माघारी परतला. यानंतर साऊथीने जसप्रीत बुमराहला शून्यावर बाद करत डावातील पाचवी विकेट घेतली.