अजिंक्य रहाणे (Photo Credit: IANS)

वेलिंग्टनमध्ये (Wellington) सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात यजमान न्यूझीलंड (New Zealand) संघाला 348 धावांवर ऑलआऊट केल्यावर भारताने (India) दुसऱ्या डावात फलंदाजी करत दिवसाखेर 4 विकेट गमावून 144 धाव केल्या. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघ (Indian Team) अजून 39 धावांनी पिछाडीवर आहे. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने आपल्या महत्वपूर्ण विकेट गमावल्या. पृथ्वी शॉ 14, मयंक अग्रवाल 58, चेतेश्वर पुजारा 11 आणि कर्णधार विराट कोहली 19 धावा करून माघारी परतले. दिवसाखेर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 25 आणि हनुमा विहारी (Hanuma Vihari) नाबाद 11 धावा करून खेळत आहेत. चौथ्या दिवशी  डावाची सुरुवात करतील. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट (Trent Boult) 3, टिम साऊथी (Tim Southee) ने 1 विकेट घेऊन भारताच्या अडचणीत वाढ करत राहिले. तिसर्‍या दिवशी जसप्रीत बुमराहने बीजे वॅटलिंगला बाद करून बर्‍याच दिवसांनी विकेट घेतली. (IND vs NZ 1st Test: पृथ्वी शॉ न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या डावातही फेल, Netizens कडून शुभमन गिल ला संधी देण्याची मागणी)

तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने 5 बाद 216 धावांवर खेळायला सुरुवात केली आणि 348 धावांवर ऑलआऊट झाले. पहिल्या डावाच्या आधारे किवी संघाने भारताविरुद्ध 183 धावांची आघाडी घेतली. दुसर्‍या डावात भारताला पृथ्वी शॉच्या रूपात पहिला धक्का बसला. पृथ्वी 14 धावांवर टॉम लाथमकडे कॅच आऊट झाला. यानंतर मयंक आणि पुजाराने भारताचा डाव पुढे नेला आणि दरम्यान मयंकने आपले अर्धशतकही पूर्ण केले. मात्र, वेलिंग्टन कसोटीच्या तिसर्‍या चहाच्या आधी शेवटच्या चेंडूवर पुजारा बाद झाला. त्यानंतर 99 चेंडूत 58 धावा करून मयंक साऊथीच्या चेंडूवर बीजे वॅटलिंगकडे झेलबाद झाला. विराट बोल्टच्या चेंडूवर वॅटलिंगकडे झेलबाद झाला. त्याने 43 चेंडूत 19 धावा केल्या.

दुसर्‍या दिवशी कर्णधार केन विल्यमसनने 89 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. न्यूझीलंडच्या कर्णधाराने त्याच्या 153 चेंडूंच्या डावात 11 चौकार ठोकले.विल्यमसनने 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या रॉस टेलरसह खेळत 93 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. टेलरने 44 धावा केल्या. काइल जैमीसन आणि कॉलिन डी ग्रैंडहोम यांनी महत्त्वपूर्ण भागीदारी करत धावसंख्या 300 च्या पार नेली.