IND vs ENG Series 2021: टीम इंडियाला मोठा झटका, Shubman Gill इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतून होऊ शकतो आऊट; या खेळाडूला मिळू शकते संधी
शुभमन गिल (Photo Credit: Facebook)

IND vs ENG Series 2021: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात पराभवानंतर टीम इंडियाचे (Team India) लक्ष इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) कसोटी मालिका जिंकून संपवण्यावर असेल. पण 4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी ‘विराटसेने’ला दुखापतीचा फटका बसला आहे. सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) संपूर्ण मालिकेतून अघोषित अंतर्गत दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडू शकतो. कसोटी मालिकेसाठी शुभमन गिल अनुपलब्ध असण्याची शक्यता असल्याने त्याच्या जागी 25 वर्षीय बंगालचा सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनला (Abhimanyu Easwaran) संघात स्थान मिळू शकते. इस्वरन एक बॅक अप खेळाडू म्हणून इंग्लंड दौर्‍यावर असल्याचे PTI ने म्हटले आहे. गिलच्या पोटरीच्या स्नायूची दुखापत किंवा हॅमस्ट्रिंग झाले असल्याचे समजले जात आहे ज्याला बरे होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. (Team India WTC 2021-23 Schedule: पुढील कसोटी चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाचे वेळापत्रक आऊट, ‘या’ 6 संघांशी भिडणार)

तसेच गिलला दुखापत कशी व केव्हा झाली हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. इंग्लंडविरुद्ध मालिकेपूर्वी गिलला शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे की नाही हे सध्या अस्पष्ट आहे, असे देखील अहवालात पुढे म्हटले आहे. शुबमन गिल इंग्लंडमध्ये मुक्काम करणार असून फिजिओ नितीन पटेल आणि सामर्थ्य व कंडिशनिंग प्रशिक्षक सोहम देसाई त्याच्या प्रगतीवर नजर ठेवतील. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “एक महिना बाकी असतानाही शुभमनला संपूर्ण कसोटी दौर्‍यावरुन बाहेर जाण्याची शक्यता आहे. दुखापत गंभीर आहे हे आम्हाला कळले आहे.” तथापि, भारत 5 कसोटी सामने खेळणार असल्याने गिल मालिकेत नंतर पुनरागमन करू शकतो. इंग्लंड विरुद्ध भारत मालिका 4 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत खेळली जाणार आहे.

दुसरीकडे, 18 ते 23 जून या कालावधीत झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गिलने अस्वस्थतेची कोणतीही चिन्हे दर्शविली नाहीत. तथापि दोन्ही डावात भारताचा सलामीवीर गोलंदाजांना फारसे त्रास देण्यास यशस्वी झाला नाही. त्याने अनुक्रमे 28 आणि 8 धावा केल्या, तर यंदा वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध घरच्या मालिकेत पंजाबच्या फलंदाजाने केवळ फक्त अर्धशतक झळकावले. गिलने ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पणाच्या कसोटी मालिकेत आपला ठसा उमटवला होता. ब्रिस्बेनच्या गब्बा येथे चौथ्या कसोटी सामन्यात भारताच्या प्रसिद्ध विजयात गिलने 91 धावा केल्या.