IND vs ENG ODIs Squad 2021: बीसीसीआयने (BCCI) पुणे येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्ध (England) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे.अखिल भारतीय ज्येष्ठ निवड समितीने 18-सदस्यांची टीम निवडली असून, तीन नवीन खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे जे पहिल्यांदा टीम इंडियाच्या (Team India) ब्लु जर्सीमध्ये वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसतील. यामध्ये मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू कृणाल पांड्या (Krunal Pandya), इंग्लंडविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यात भारताकडून विजयी अर्धशतकी कामगिरी करणारा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सचा फिरकीपटू प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) यांना पहिल्यांदा एकदिवसीय संघात प्रवेश मिळाला आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे, विजय हजारे ट्रॉफीमध्ये 800 पेक्षा धिक धावा करणारा पृथ्वी शॉ आणि 700 हून अधिक धावा करणाऱ्या देवदत्त पडिक्क्ल यांना वनडे संघात संधी मिळाली नाही, कारण भारताकडे आधीच चार ओपनर्स आहेत. दरम्यान, घरगुती स्तरावर प्रभावी कामगिरी करत राष्ट्रीय संघात स्थान मिळवलेला या तीन खेळाडूंच्या कामगिरीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (IND vs ENG 4th T20I 2021: मोठ्या विजयासह भारताचे दणक्यात पुनरागमन, थरारक सामन्यात इंग्लंडचा 8 धावांनी दारुण पराभव; मालिका 2-2 अशा बरोबरीत)
4 नोव्हेंबर 2018 ते 7 नोव्हेंबर 2019 या कालावधीत देशासाठी 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार्या अष्टपैलू क्रुणालला प्रथमच भारताच्या वनडे आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळालं आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर कृणालला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये क्रुणालने 5 डावांमध्ये 388 धावा केल्या, त्यात दोन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. शिवाय, बडोदा संघासाठी क्रुणालने 5 विकेटही घेतल्या होत्या. दुसरीकडे, मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा30 वर्षीय सूर्यकुमार यादव बऱ्याच काळापासून भारताच्या मर्यादित ओव्हरच्या संघात स्थान मिळवण्याचा दावेदार होता, पण आता त्याला संधी आहे. त्याने गेल्या वर्षी आयपीएलमध्ये पुन्हा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीच्या 5 सामन्यांत 332 धावा केल्या ज्यामुळे त्याला अखेर भारतीय संघात प्रवेश मिळाला. यापूर्वी, दुसर्या टी-20 सामन्यात कर्णधार विराट कोहलीने सूर्याला तिसर्या क्रमांकावर पाठवले आणि तो कोणत्याही परिस्थितीत चांगला खेळ करू शकतो हे त्याने आपल्या शानदार अर्धशतकाने दाखवले.
Three potential ODI debutants in the squad.
Prasidh Krishna, Suryakumar Yadav and Krunal Pandya have all been named in India's 18-player squad to take on England.#INDvENG pic.twitter.com/PKJsZbK3Ug
— ICC (@ICC) March 19, 2021
दरम्यान, बुमराह उपलब्ध नसल्यामुळे प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळाली आहे. नुकत्याच संपुष्टात आलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये प्रसिद्ध कृष्णाने कर्नाटककडून सात सामन्यांत 14 विकेट घेतल्या होत्या. 25 वर्षीय वेगवान गोलंदाजाने घरेलू क्रिकेटमध्ये 100 हून अधिक गडी बाद केले आहेत. आयपीएलमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्ससाठी देखील चांगला गोलंदाज असल्याचे सिद्ध झाले आहे.