IND vs ENG 4th T20I 2021: अहमदाबादच्या (Ahmedabad) मोटेरा स्टेडियमवर नुकत्याच संपुष्टात आलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात इंग्लंडविरुद्ध (England) मोठ्या विजयासह भारताने (India) पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. टीम इंडियाने पहिले फलंदाजी करत सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) 57 आणि श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer_ 37 धावांच्या जोरावर 185 धावांचा डोंगर उभारला होता. याच्या प्रत्युत्तरात इंग्लिश संघ 8 विकेट गमवून 177 धावांपर्यंतच मजल मारू शकला. जोफ्रा आर्चर 18 धावा करून नाबाद परतला. बेन स्टोक्सने (Ben Stokes) सर्वाधिक 46 धावा केल्या. जेसन रॉयने 40 धावा तर जॉनी बेअरस्टोने 25 आणि डेविड मलानने 14 धावांचे योगदान दिले. क्रिस जॉर्डनने 12 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली आणि नियमित अंतराने विकेट देखील काढत इंग्लंडला दबावात आणले. संघासाठी शार्दूल ठाकूरने तीन विकेट घेतल्या तर राहुल चाहर आणि हार्दिक पांड्या यांना प्रत्येकी 2 विकेट, तर भुवनेश्वर कुमारला 1 विकेट मिळाली. (IND vs ENG 4th T20I 2021: Suryakumar Yadav आऊट की नॉट आऊट? फलंदाजाच्या वादग्रस्त विकेटवर विराटसह Netizensने दिली अशी रिअक्शन)
टीम इंडियाने टॉस गमावून दिलेल्या धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात इंग्लिश संघाची सुरुवात खराब झाली. भुवनेश्वरने गोलंदाजीने टीम इंडियाला शानदार सुरुवात देत पहिली ओव्हर मेडन टाकली. त्यानंतर त्याने जोस बटलरला केएल राहुलच्या हाती कॅच आऊट करत इंग्लंडला मोठा धक्का दिला. इंग्लंडने पहिल्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 48 धावा केल्या. पांड्याने इंग्लंडला तिसरा धक्का दिला आणि रॉयला आऊट यादवच्या हाती कॅच आऊट केलं. रॉयने 40 धावांची खेळी केली. यादरम्यान, स्टोक्स आणि बेयरस्टो मैदानात चांगलेच सेट झाले आणि दोघांनी जोरदार फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पण, चाहरनेने इंग्लंडला चौथा धक्का दिला. राहुलने बेअरस्टोला वॉशिंग्टन सुंदरच्या हाती कॅच आऊट केलं. बेअरस्टोने 25 धावांची खेळी केली. यानंतर, स्टोक्स आणि मॉर्गन अधिक काळ मैदानावर टिकू शकला नाही. शार्दूलने ओव्हरच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोंघांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. यानंतर, संघाचा डाव गडगडला आणि भारताने मालिकेत दणक्यात पुनरागमन केले.
यापूर्वी, टीम इंडियाकडून सूर्यकुमारने सर्वाधिक 57 धावा केल्या, तर श्रेयसने फटकेबाजी करत अफलातून 37 धावांची खेळी केली. दुसरीकडे, इंग्लिश टीमसाठी जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.