IND vs ENG 4th T20I 2021: Suryakumar Yadav आऊट की नॉट आऊट? फलंदाजाच्या वादग्रस्त विकेटवर विराटसह Netizensने दिली अशी रिअक्शन
डेविड मलानच्या विवादास्पद कॅचवर विराट कोहली (Photo Credit: Twitter)

IND vs ENG 4th T20I 2021: इंग्लंडविरुद्ध (England) अहमदाबाद (Ahmedabad) येथे सुरु असलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात थर्ड अंपायरच्या वादग्रस्त निर्णयामुळे सूर्यकुमार यादवचे (Suryakumar Yadav) फलंदाजी डेब्यू वेगळ्याच वळणावर संपुष्टात आले. सूर्यकुमार 31 चेंडूंत 57 धावांवर फलंदाजी करीत होता, जेव्हा त्याने सॅम कुरनच्या (Sam Curran) लॉन्गशॉटवर त्याने सुरेख लेगच्या दिशेने चेंडू खेचला. तथापि, डेविड मलानने (Dawid Malan) धावत येत झेल पकडला आणि सूर्यकुमारला माघारी धाडलं. थर्ड अंपायरकडे या निर्णयाचा संदर्भ देण्यात आला तर या मैदानावरील अंपायरने फलंदाजांना बाद केले. एकाधिक व्हिडिओच्या तपासणीनंतर थर्ड अंपायरने ऑन-फील्ड कॉल कायम ठेवला ज्यामुळे सूर्यकुमारला पॅव्हिलियनमध्ये परतावे लागले. रिप्लेमध्ये चेंडू जमील स्पर्श करताना दिसून येत होता परंतु थर्ड अंपायरकडे काही निर्णायक नसल्याने ते मैदानावरील अंपायरचा निर्णय बदलू शकले नाहीत. (IND vs ENG 4th T20I 2021: सूर्यकुमार यादवचा झंझावात, भारताचा धावांचा डोंगर; इंग्लंडला विजयासाठी 186 धावांचे लक्ष्य)

दरम्यान, थर्ड अंपायरच्या निर्णयाने हा खेळ लाईव्ह पाहणारे लाखो चाहते आश्चर्यचकित झाले. भारतीय कर्णधार विराट कोहलीदेखील या निर्णयाने प्रभावित झाला नाही आणि त्याने देखील आपली निराशा व्यक्त केली. इतकंच नाही तर माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि बॉलिवूड सुपरस्टार रणवीरस सिंह यांनीही थर्ड अंपायरच्या निर्णयावर कडक टीका केली. पहा व्हिडिओ.

पहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

स्वीकारले जाणारे!

अंपायरला 3D चष्मा द्या

थर्ड अंपायर आंधळा आहे

सर्वात वाईट निर्णय

भारतीय बॅटिंगनंतर विराट कोहली

अंपायरला काढून टाका.

लेन्सकार्टसाठी...!

खराब अम्पायरिंग!

दुसरीकडे, सूर्यकुमारच्या शानदार अर्धशतक आणि श्रेयस अय्यरच्या 18 चेंडूत 37 यजमान टीम इंडियाने अखेर 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 185 धावा केल्या. भारताने चांगली सुरुवात केली मात्र रोहित शर्मा आणि केएल राहुलची सलामी जोडी 20 धावांच्या भागीदारीपुढे जाऊ शकली नाही. शिवाय, कर्णधार विराट देखील एकच धाव करून परतला. अशास्थितीत सूर्यकुमारनेच फलंदाजीक्रम सांभाळला. सूर्यानंतर श्रेयस अय्यरने भार स्वीकारला आणि 205.56 च्या स्ट्राइक-रेटने फलंदाजी केली. रिषभ पंतने 23 मध्ये 30 धावा केल्या. आजच्या सामन्यात विजय मिळवून इंग्लंड मालिका 3-1 ने जिंकेल किंवा मालिका पाचव्या निर्णायक टी-20 सामान्यांपर्यंत जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने आतापर्यंत मालिकेत तीनही टी-20 सामने जिंकले आहेत.