IND vs ENG ODIs 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) क्रिकेट संघात पुणे (Pune) येथे तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. तीन सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेसाठी यजमान भारतीय संघाची (Indian Team) लवकरच घोषणा केली जाणार असून संघात दोन नवीन खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड, बीसीसीआय (BCCI), दोन नवीन खेळाडूंची निवड करू शकते ज्यापैकी एकाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे तर दुसरा आजवर एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी खेळलेला नाही. नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये 14 विकेट्स घेतलेल्या कर्नाटकी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला (Prasidh Krishna) इंग्लंडविरुद्ध आगामी मालिकेसाठी भारतीय एकदिवसीय संघात निवडले जाऊ शकते. शिवाय, या मालिकेतही तो पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची शक्यता आहे. कृष्णा व्यतिरिक्त अष्टपैलू क्रुणाल पांड्याला (Krunal Pandya) पहिल्यांदा भारतीय एकदिवसीय संघात स्थान मिळू शकते. अष्टपैलू क्रुणाल देशासाठी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट खेळला आहे, पण पहिल्यांदाच एकदिवसीय संघात संधी मिळू शकते. (IND vs ENG 3rd T20I 2021: तिसऱ्या टी-20 सामन्यातून ‘या’ ओपनरचा होऊ शकतो पत्ता कट, पहा टीम इंडियाची संभावित Playing XI)

गेल्या काही वर्षातील भारतीय घरगुती सर्किटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज असलेला कृष्णा पेस विभागात मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर यांच्यासह जोडी काम करेल. सोमवारी लग्नाची घोषणा करणारा बुमराह कदाचित मोठ्या ब्रेकवर जाऊ तो. शिवाय, क्रुणाल हा एक अष्टपैलू म्हणून 18 सदस्यीय संघात असू शकतो कारण रविंद्र जडेजा अजूनही दुखापतीतून सावरत असल्याने संघात त्याचे पुनरागमन लांबणीवर पडले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये क्रुणालने दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली होती. शिवाय त्याने यापूर्वी खेळलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही चांगली खेळी खेळली होती, परंतु वडिलांच्या निधनानंतर त्याने स्पर्धेतून माघार घेतली होती.

दुसरीकडे मात्र, विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून 827 धावा फटकावणाऱ्या पृथ्वी शॉ आणि कर्नाटककडून हंगामात 737 धावांची खेळी करणार्‍या देवदत्त पडिक्क्लला देखील प्रतीक्षा करावी लागू शकते. क्रिकबझच्या अहवालानुसार, केएल राहुल, शुभमन गिल, शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्यामुळे निवड समितीत सलामीच्या जोडीसाठी कोणत्याही खेळाडूचा समावेश नसल्याचा म्हटलं जात असून सर्व चार सलामी फलंदाजांना पुणे येथे 23, 26 आणि 28 मार्च रोजी होणार्‍या तीन सामन्यांसाठी संघात स्थान मिळणार आहे. कोणालाही विश्रांती दिली जाणार नाही अशीही शक्यता आहे आणि मोहम्मद शमी देखील दुखापतीतून सावरत असल्याने इंग्लंडविरुद्ध वनडे संघात त्याचे पुनरागमन होणार होणे कठीण दिसत आहे.