IND vs ENG: भारताला मोठा धक्का; मयंक अग्रवाल कन्क्शनमुळे पहिल्या टेस्टमधून आऊट, रोहित शर्मासह KL Rahul सलामीला येण्याची शक्यता
मयांक अग्रवाल (Photo Credits: Getty)

IND vs ENG Series 2021: इंग्लंडविरुद्ध (England) कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला  (Indian Team) दुखापतीचा फटका बसला आहे. सलामीवीर मयांक अग्रवालला (Mayank Agarwal) मालिकेच्या पहिल्या सामन्यातून वगळण्यात आले आहे. सोमवारी नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज येथे भारताच्या नेट सत्रादरम्यान फलंदाजी सराव करताना अग्रवालच्या हेल्मेटवर बॉल आदळला. आतापर्यंत भारतासाठी 14 कसोटी खेळलेल्या अग्रवालने कन्क्शनची चिन्हे दाखवली आणि 5 सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या कसोटीतून त्याला वगळण्यात आले, असे बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. अग्रवालचे बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने मूल्यांकन केले आणि एक कन्सक्शन टेस्ट घेण्यात आली. तथापि, 30 वर्षीय मयंक स्थिर आहे आणि तो जवळच्या वैद्यकीय निरीक्षणाखाली राहील. (IND vs ENG 2021: इंग्लंडमध्ये टीम इंडियाचा विजय सलामी जोडीवर अवलंबून, राहुल द्रविड यांच्यापासून सेहवागपर्यंत दिग्गज ठरले आहेत अपयशी)

दरम्यान, आता मयंकच्या अनुपस्थितीत केएल राहुलला (KL Rahul) सलामीवीर म्हणून संधी मिळू शकते. राहुल बहुतेक कसोटी सामन्यांमध्ये सलामीला आला आहे पण तो मधल्या फळीत खेळणे पसंत करतो. संघातील सलामीच्या फलंदाजासाठी बंगालचा अभिमन्यू ईश्वरन आणखी एक पर्याय आहे. मात्र, हनुमा विहारीला संघात सलामीवीर म्हणूनही संधी मिळू शकते. विहारी ऑफ स्पिन गोलंदाजी करतो आणि जर तो सलामीवीर म्हणून संघात सामील झाला तर गोलंदाजी अष्टपैलू शार्दुल ठाकूरलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जाऊ शकते. दुसरीकडे, जूनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या फायनल सामन्यानंतर भारतीय संघ आधीच दुखापतींच्या मालिकेने ग्रासले आहे. शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि अवेश खान यांना मालिकेतून वगळण्यात आले असून त्यांच्या जागी पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांचा समावेश करण्यात आला आहे. तथापि, या जोडीला 10 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे आणि ते तिसऱ्या कसोटीपासून खेळण्यासाठी उपलब्ध असतील.

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक येथे पहा...

पहिली कसोटी, ऑगस्ट 4-8, नॉटिंगहम, दुपारी 3:30 (भारतीय वेळ)

दुसरी कसोटी, 12-16 ऑगस्ट, लंडन, दुपारी 3:30 (भारतीय वेळ)

तिसरी कसोटी, 25-29 ऑगस्ट, लीड्स, दुपारी 3:30 (भारतीय वेळ)

चौथी कसोटी, 2-6 सप्टेंबर, लंडन, दुपारी 3:30 (भारतीय वेळ)

पाचवी कसोटी, 10-14 सप्टेंबर, मँचेस्टर, दुपारी 3:30 (भारतीय वेळ)