IND vs ENG 2021: इंग्लंडमध्ये टीम इंडियाचा विजय सलामी जोडीवर अवलंबून, राहुल द्रविड यांच्यापासून सेहवागपर्यंत दिग्गज ठरले आहेत अपयशी
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG Series 2021: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (World Test Championship) न्यूझीलंडच्या हातून पराभवानंतर आता टीम इंडियापुढे (Team India) आता इंग्लंड संघाचे (England Team) आव्हान आहे. भारत दौऱ्यावर कसोटी मालिका गमावणार ब्रिटिश कसोटी संघ पाच सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाचे पाहुणचार करेल. भारताने गेल्या वीस वर्षांत इंग्लंडमध्ये 21 कसोटी सामने खेळले आहेत. पण यातून त्याने फक्त 4 जिंकले आहेत. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या 10 कसोटींमध्ये भारताने फक्त दोन जिंकले आहेत, तर 7 सामन्यात त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहेत. संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे सलामीची जोडी आहे. भारतीय सलामीवीर नेहमी इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल परिस्थितीत संघर्ष करत आले आहेत. किमान गेल्या 20 वर्षांचा रेकॉर्ड ही गोष्ट सांगत आहे. (IND vs ENG: इंग्लिश ‘कसोटी’पूर्वी टीम इंडियाची मौज-मस्ती, रोहित शर्माचा अनोखा खेळ खेळत खेळाडू हसून हसून लोटपोट)

भारतीय संघाने यादरम्यान सलामीवीर म्हणून 10 फलंदाजांचा प्रयोग केला आहे. यामध्ये राहुल द्रविड (Rahul Dravid), वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag), गौतम गंभीर, शिखर धवन, दिनेश कार्तिक, संजय बांगर, वसीम जाफर, अभिनव मुकुंद, मुरली विजय आणि केएल राहुल (KL Rahul) यांचा समावेश आहे. पण द्रविड, सेहवाग आणि गंभीरसारखे अनुभवी फलंदाजही या भूमिकेत फिट बसले नाही. दरम्यान, इंग्लंडमध्ये भारतीय सलामीची जोडी अपयशी होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. ब्रिटनमध्ये खेळलेल्या शेवटच्या 21 कसोटींमध्ये भारतीय सलामी जोडीने केवळ एकदाच शतकी भागीदारी करू शकली आहे. 2007 मध्ये असे घडले होते जेव्हा राहुल द्रविडच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडला त्यांच्या घरी 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पराभूत केले होते. त्या मालिकेत भारताच्या विजयाचे सर्वात मोठे कारण दिनेश कार्तिक व वसीम जाफरची सलामी जोडी कारण होती. या सलामीच्या जोडीने 6 डावांमध्ये 53 पेक्षा जास्त सरासरीने 322 धावा काढल्या होत्या. दोघांमध्ये एक शतक आणि एक अर्धशतकी भागीदारी झाली. कार्तिक आणि जाफर तीनही कसोटीत सलामीला उतरले होते. खेळाडूंवर कर्णधाराच्या विश्वासाचा परिणाम मालिकेच्या निकालावर दिसून आला. आणि 1986 नंतर इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्यात भारताला यश आले. मात्र, यानंतर भारतीय सलामीवीर इंग्लंडमध्ये अशी कामगिरी करू शकले नाहीत.

2011, 2014 आणि 2018 मध्ये तिन्ही मालिकांमध्ये भारताला इंग्लंडकडून पराभवाला सामोरे जावे लागले. याचे कारण सुरुवातीच्या जोडीतील वारंवार बदल होते. दुसरीकडे, आगामी कसोटी मालिकेपूर्वी देखील भारतीय संघाला सलामी जोडीच्या समान समस्येला सामोरे जावे लागत आहे. रोहितचा साथीदार म्हणून मयंक अग्रवाल, अभिमन्यू ईश्वरन आणि केएल राहुल यांचा पर्याय आहेत. संघ व्यवस्थापनाला या तीन फलंदाजांपैकी ज्या खेळाडूला रोहितचा जोडीदार बनवते त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल, तरच 2007 च्या निकालाची पुनरावृत्ती होऊ शकते.