विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. दोन्ही संघातील पाच सामन्यांची टेस्ट सिरीज सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. त्यामुळे चौथा कसोटी सामना जिंकून मालिकेत विजय आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. ओव्हल (The Oval) मैदानावर या दोन संघांतील खेळाडूंमध्ये कोटीची टक्कर होत असताना, इंग्लंडची बार्मी आर्मी (Barmy Army) आणि द भारत आर्मी (The Bharat Army) यांच्यात सोशल मीडियावर एक वेगळे युद्ध सुरु आहे. बार्मी आर्मी यंदा मालिकेच्या सुरुवातीपासूनच टीम इंडिया (Team India) कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) टार्गेट करताना दिसत आहे. मालिकेच्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात विराट 50 धावांवर बाद झाला आणि अशाप्रकारे त्याच्या 71 व्या आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षा आणखी वाढली आहेत. याबाबत बार्मी आर्मीने भारतीय कर्णधाराला टार्गेट केले. पण त्यावर प्रत्युत्तर देत भारत आर्मीने त्याची बोलती बंद केली. (IND vs ENG 4th Test Day 1: शार्दूल ठाकूरचे ताबडतोड अर्धशतक, भारत गोलंदाजांचा भेदक मारा; दिवसाखेर इंग्लंड 3 बाद 53 धावा)

विराटचा फोटो शेअर करून बार्मी आर्मीने लिहिले, 'शतकाशिवाय किती दिवस गेले हे पाहताना विराटचा चेहरा.' विराटने बांगलादेशविरुद्ध अखेर पिंक-बॉल टेस्ट सामन्यात 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. याला भारत आर्मीने प्रतिसादात देत लिहिले, '70 >>>> 39 ', म्हणजे 70 हे 39 पेक्षा बरेच जास्त आहे. विराटच्या नावावर 70 आंतरराष्ट्रीय शतके आहेत, तर इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या खात्यात फक्त 39 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. दरम्यान, भारताविरुद्ध यंदाच्या मालिकेत रूटने सलग तीन शतके ठोकली आहेत आणि तो जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे, तर विराट फलंदाजीत संघर्ष करताना दिसत आहे. या संपूर्ण मालिकेत आतापर्यंत खेळलेल्या सहा डावांमध्ये विराटने 29 च्या सरासरीने 174 धावा केल्या आहेत, ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

दुसरीकडे, विराटने 27 कसोटी आणि 43 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतके आहेत, तर रूटने 23 कसोटी व 16 वनडे आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत. विराट कोहलीचे शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक नोव्हेंबर 2019 मध्ये आले होते. त्यानंतर त्याला एकही शतक ठोकता आले नाही. लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात विराटची प्रतीक्षा संपेल असे वाटत होते, पण 50 तो धावा करून पुन्हा एकदा ओली रॉबिन्सनचा शिकार बनला आणि माघारी परतला. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील सध्याच्या मालिकेत रॉबिन्सनने आतापर्यंत विराटला तीन वेळा पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे.