IND vs ENG 3rd Test Day 3: तिसऱ्या कसोटीत टीम इंडिया कसे करू शकते कमबॅक? स्टार भारतीय गोलंदाजाने लीड्स खेळपट्टीवर केले मोठे भाष्य
मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज व रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd Test Day 3: इंग्लंड (England) विरोधात हेडिंग्लेवर (Headingley) खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीत टीम इंडिया (Team India) पूर्णपणे बॅकफूटवर दिसत आहे. पहिल्या डावात 78 धावांवर ऑल आऊट झालेल्या विराट अँड कंपनीविरुद्ध इंग्लंडने पहिल्या डावात 420 हून अधिक धावांपर्यंत मजल मारली आहेत आणि आता त्यांच्या हातात अद्याप दोन विकेट्स शिल्लक आहेत. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) पहिल्या डावात तीन विकेट्स घेतल्या आहेत आणि तो म्हणाला की आम्ही अजून हार मानलेली नाही. लीड्स कसोटी सामन्यात आम्ही अजूनही पुनरागमन करू शकतो असे शमीने सांगितले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर इंग्लंडने 8 बाद 345 धावांची आघाडी घेतली आहेत. कर्णधार जो रूटने 121 धावांची शानदार खेळी खेळली आणि संघाला मजबूत स्थितीत नेण्यात मोलाची भूमिका बजावली. शमी म्हणाला की, तिसऱ्या कसोटीत आतापर्यंत संघाच्या कामगिरीचा खेळाडूंच्या मनोबलवर परिणाम झाला नाही कारण पाच सामन्यांच्या मालिकेत बराच वेळ शिल्लक आहे. (IND vs ENG 3rd Test Day 3 Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड लीड्स टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six व DD Sports वर असे पाहा)

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शमी म्हणाला, “आम्ही काही सामने तीन दिवसांत आणि काही सामने दोन दिवसांत पूर्ण केले. कधीकधी असे घडते की तुमच्यावर वाईट दिवस येतात, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण हार मानली पाहिजे. यानंतरही दोन सामने शिल्लक आहेत आणि आम्ही अजूनही मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहोत. आपण स्वतःवर आणि आपल्या कौशल्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. ही तुमची जबाबदारी आहे की जरी विरोधी संघाकडून मोठी भागीदारी येत असली तरी तुम्ही डोके टेकणार नाही.” शमीने असे देखील सांगितले की, ही खेळपट्टी अत्यंत संथ आहे, ज्यामुळे फलंदाजांना मदत होत आहे. शमी म्हणाला की याच कारणामुळे भारतीय गोलंदाज येथे विकेट घेण्यासाठी धडपडत आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत शमी म्हणाला, “जेव्हा खेळपट्टी संथ असते तेव्हा कौशल्यावर परिणाम होतो. उसळी कमी होते. जेव्हा खेळपट्टी मंदावू लागते, चेंडू वेगाने फिरणे आणि स्विंग करणे थांबवतो.” इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी टॉस जिंकून पहिल्या डावात भारताचा डाव 78 धावांवर संपुष्टात आला.

शमी पुढे म्हणाला, “विकेट घेण्याचा प्रयत्न करत राहणे हे तुमचे काम आहे. फलंदाजाला कसे बाहेर काढायचे हे तुमच्या मनात नेहमी नियोजन करावे लागते. जर भागीदारी मजबूत होत असेल आणि तुम्ही हार मानली तर ती भागीदारी अधिक मजबूत होईल. परंतु जर तुम्ही भागीदारी तोडली तर संघाला अधिक पर्याय मिळतील. दुसऱ्या डावात फलंदाजांना घट्ट खेळावे लागेल. सामन्याचा निकाल अद्याप आलेला नाही.” शमीने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडच्या दुसऱ्या डावात 87 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या. रूट आणि कंपनीने रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यासह सर्व भारतीय गोलंदाजांची चांगलाच समाचार घेत दुसऱ्या दिवशी बॅटने वर्चस्व गाजवले.