IND vs ENG 3rd Test: इंग्लंडचा ‘हा’ मॅच-विनर ठरतोय टीम इंडियाची सर्वात मोठी डोकेदुखी, लीड्सच्या हेडिंग्लेवर इतिहास रचण्यासाठी तयार
जो रूट (Photo Credit: Twitter/@englandcricket)

IND vs ENG 3rd Test: इंग्लंडमध्ये (England) 14 वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याच्या भारताच्या (Indai) आशेला सर्वात मोठा धोका म्हणजे ब्रिटिश संघाचा कर्णधार जो रूट (Joe Root) स्वतः आहे. रूट सध्या भारताविरुद्ध सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. कसोटी इतिहासात क्वचितच असे फलंदाज आहेत ज्यांनी भारताविरुद्ध 2100 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि जो रूटचा या फलंदाजांच्या एलिट यादीतील एक आहे. लीड्स (Leeds( येथे भारताविरुद्ध तिसरी कसोटी सामन्यात रूट सर्वाधिक टेस्ट धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विश्व क्रिकेटमधील एका दिग्गज फलंदाजाला मागे ढकलू शकतो. टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिकेचा रणसंग्राम सुरु आहे. दुसरी लॉर्ड्स कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघाने (Indian Team) मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आणि आता आता त्यांची नजर तिसरी कसोटी जिंकून मालिका विजयाच्या जवळ जाण्यावर असेल. पण रूट एक मोठा अडथळा ठरू शकतो. (IND vs ENG 3rd Test Day 1: इंग्लंड सलामीवीरांची धडाकेबाज सुरुवात, दिवसाखेर बिनबाद केल्या 120 धावा; भारताला पहिल्या विकेटची प्रतीक्षा)

यंदा रूटने टीम इंडियाविरुद्ध 3 शतके केली आहेत. त्याने भारताविरुद्ध आतापर्यंत 22 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 60.41 च्या सरासरीने 2175 धावा केल्या आहेत. यामध्ये 7 शतकांचा समावेश आहे. पाकिस्तानचे माजी दिग्गज कर्णधार जावेद मियांदाद (Javed Miandad) एकमेव फलंदाज आहे ज्यांनी भारताविरुद्ध रूटपेक्षा जास्त सरासरीने जास्त धावा केल्या आहेत. पण लीड्स कसोटीनंतर हा विक्रम क्वचितच कायम राहील असे दिसत आहे. मियांदादने भारताविरुद्ध 67.51 च्या सरासरीने 2228 धावा केल्या आहेत. ज्यात 5 शतकांचा समावेश आहे. म्हणजेच रूट  आता त्यांच्या फक्त 53 धावांनी पिछाडीवर आहे. शिवाय, रूटचा फॉर्म पाहता लीड्स कसोटीदरम्यान तो मियांदादला मागे टाकेल असे दिसत आहे. इतकंच नाही तर शतकाच्या बाबतीतही रूट पाकिस्तानी दिग्गज फलंदाजाच्या पुढे जाईल. मियांदादने भारताविरुद्ध 5 शतके केली आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगने भारताविरुद्ध 8 शतकांसह सर्वात जास्त एकूण 2555 धावा केल्या आहेत. त्यानंतर माजी इंग्लिश कर्णधार अॅलिस्टर कुकने भारताविरुद्ध 30 सामन्यांत 7 शतकांसह 2431 धावा केल्या आहेत तर वेस्ट इंडिज क्लाइव्ह लॉयड यांनी 7 शतकासह 2344 धावा केल्या आहेत. या फलंदाजांमध्ये झहीर अब्बास, स्टीव्ह स्मिथ, जॅक कॅलिस, युनूस खान, एव्हर्टन वीक्स, केनेथ बॅरिंग्टन यांचाही समावेश आहे. या सर्व फलंदाजांनी भारताविरुद्ध 70 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. वीक्सने 106.78 च्या सरासरीने 1495 धावा केल्या आहेत आणि फ्लॉवरने 94 च्या सरासरीने 1138 धावा केल्या आहेत.