IND vs ENG 3rd Test Day 1: इंग्लंड सलामीवीरांची धडाकेबाज सुरुवात, दिवसाखेर बिनबाद केल्या 120 धावा; भारताला पहिल्या विकेटची प्रतीक्षा
इंग्लंड विरुद्ध भारत (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG 3rd Test Day 1: इंग्लंडविरुद्ध (England) तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारतासाठी (India) प्रचंड खराब ठरला. लीड्सच्या (Leeds) हेडिंग्ले (Headingley) स्टेडियमवर भारतीय संघाने (Indian Team) टॉस जिंकून पहिले फलंदाजी केली पण इंग्लंड संघाच्या वेगवान गोलंदाजांच्या तडाखेबाज खेळीपुढे भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले व टीम पहिल्या डावात 78 धावाच करू शकला. प्रत्युत्तरात पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ब्रिटिश संघासाठी रोरी बर्न्स (Rory Burns) व हसीब हमीदच्या (Haseeb Hameed) सलामी जोडीने धडाकेबाज सुरुवात करून देत दिवसाखेर 42 ओव्हरमध्ये बिनबाद 118 धावा केल्या आणि भारतावर 40 धावांची आघाडी घेतली. पहिल्या दिवसाखेर बर्न्स 125 चेंडूत 52 धावा तर हमीद 130 चेंडूत 58 धावा करून खेळत होते. दुसरीकडे, मातब्बर फलंदाजांच्या अपयशानंतर गोलंदाजांना पहिल्या विकेटसाठी संघर्ष करावा लागला पण बर्न्स-हमीदच्या सलामी जोडीने घाम काढला. पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा लॉर्ड्स कसोटी सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 0-1 अशी आघाडी घेतल्यामुळे यजमान इंग्लिश संघावर बरोबरी करण्याचा दबाव आहे. (IND vs ENG 3rd Test Day 1: भारताच्या कसोटी इतिहासातील सर्वात लाजिरवाणा दिवस, 89 वर्षात पहिल्यांदा घडले असे)

भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय चुकीचा ठरला. कारण पहिले फलंदाजीला आलेल्या भारतीय फलंदाजांची सुरुवातच खराब झाली. इंग्लिश गोलंदाजांच्या माऱ्यापुढे भारतीय फलंदाज जास्त काळ तग धरु शकले नाहीत. टीम इंडियाचे सर्व फलंदाज अवघ्या 78 धावांवर तंबूत परतले. भारतीय संघाकडून रोहित शर्माने सर्वाधिक 19 धावा केल्या. त्यापाठोपाठ अजिंक्य रहाणे याने 18 धावा केल्या. भारतीय संघाचे तब्ब्ल 9 फलंदाज दहाचा आकडा देखील पार करू शकले नाही. तसेच इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग आव्हर्टन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर ऑली रॉबिन्सन आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स काढल्या. सलामीवीर केएल राहुल पहिल्याच षटकाच्या पाचव्या बोलवर बाद झाला. त्यानंतर पुन्हा पाचव्या षटकात अँडरसनने चेतेश्वर पुजाराला झेलबाद केलं. पुजारा नंतर कर्णधार विराटने रोहितसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अँडरसन आणि जोस बटलर या दोघांनी मिळून कोहलीला झेलबाद केलं. त्यानंतर मैदानावर आलेल्या अजिंक्य रहाणेकडे भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा होत्या. पण इंग्लंडच्या रॉबिन्सनने आशांवर पाणी फेरलं. आणि राहणेला झेलबाद केले.

त्यानंतर भारतीय संघाला जणू काही उतरती कळाच लागली. दिवसाच्या दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला रिषभ पंत 2 धावांवर बाद झाला. पंतनंतर सलामीवर रोहितही झेलबाद होऊन अखेर माघारी परतला. रोहितपाठोपाठ काही धावांच्या अंतरावर एकामागेएक मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, जसप्रित बुमराह, मोहम्मद सिराज बाद झाले आणि भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 78 धावांवर संपुष्टात आला. अशाप्रकारे आता इंग्लंडला लॉर्ड्स कसोटीच्या पराभवाचा बदला घेत मालिकेत बरोबरी साधण्याची उत्तम संधी आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड 10 विकेट्सच्या जोरावर भारतापुढे मोठी आघाडी घेण्यासाठी मैदानात उतरेल.