IND vs ENG 3rd Test Day 1: भारताच्या कसोटी इतिहासातील सर्वात लाजिरवाणा दिवस, 89 वर्षात पहिल्यांदा घडले असे
इंग्लंड विरुद्ध भारत (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd Test Day 1: इंग्लंडविरुद्ध (England) लीड्स कसोटी (Leeds Test) सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ (Indian Team) अवघ्या 78 धावांवर ढेर झाला. पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे संघाला कसोटी इतिहासातील सर्वात लाजिरवाणा दिवस पाहावा लागला. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना हेडिंग्ले (Headingley) येथे खेळला जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेला भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या 78 धावांवर सर्वबाद झाला. या डावात भारतीय फलंदाजांनी चांगलीच निराशा केली. संघाचे 9 फलंदाज धावसंख्या दुहेरी आकडाही पार करू शकली नाही. रोहित शर्माने 19 तर अजिंक्य रहाणेने 18 धावा केल्या. (IND vs ENG 3rd Test Day 1: लीड्सवर इंग्लंड गोलंदाजांचा तिखट मारा, भारताची पहिल्या डावात फक्त 78 धावांपर्यंत मजल)

भारताने 1932 मध्ये पहिल्यांदा कसोटी क्रिकेट खेळले आणि त्यानंतर तब्बल 89 वर्षे झाली आहेत. तेव्हा भारतीय संघाच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच एकाही फलंदाजाने पहिल्या डावात 20 धावांचा टप्पा स्पर्श केला नव्हता. आतापर्यंत, कोणत्याही कसोटीत असे घडले नाही जेव्हा भारतीय फलंदाजांनी डाव संपल्यानंतर 20 पेक्षा कमी धावा केल्या. सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर रोहितने 105 चेंडूंचा सामना केला आणि सर्वाधिक 19 धावा केल्या. इतकंच नाही तर भारताने इंग्लंडमध्ये 1974 मध्ये लॉर्ड्सवर सर्वात कमी कसोटी धावसंख्या केली जेव्हा संपूर्ण संघ 42 धावांवर गुंडाळला गेला होता. त्यापूर्वी 1952 मँचेस्टरमध्ये भारतीय संघ फक्त 58 धावाच करू शकला होता जो इंग्लंडमधील दुसरा सर्वात कमी कसोटी स्कोर आहे. लीड्समध्ये केलेली ही 78 धावांची धावसंख्या आता टीम इंडियाची इंग्लंडमधील तिसरी सर्वात कमी धावसंख्या बनली आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात फक्त 40.4 ओव्हरचा सामना केला आणि यादरम्यान, टीम इंडियाने शेवटच्या 5 विकेट्स अर्ध्या तासात गमावल्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हरटनने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच ओली रॉबिन्सन आणि सॅम कुरन यांना प्रत्येकी 2 विकेट्स मिळाल्या.

लीड्स कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. संघाचा सलामीवीर केएल राहुल पहिल्याच ओव्हरपॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर पुजारालाही जेम्स अँडरसनने एका धावेवर माघारी धाडले. दुसरीकडे, मागील सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद शमीला यावेळी खातेही उघडता आले नाही. यासह जसप्रीत बुमराह देखील सॅम कुरनच्या चेंडूवर राहुल आणि शमीप्रमाणे शून्यावर बाद झाले.