विराटची नेट्समध्ये बॅटिंग आणि गोलंदाजी (Photo Credit: Twitter)

Virat Kohli Imitates Steve Smith: भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अहमदाबादमधील (Ahmedabad) नूतनीकरण केलेले नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये इंग्लंडविरुद्ध (England) तिसऱ्या पिंक-बॉल टेस्टपूर्वी (Pink-Ball Test) फुल फॉर्ममध्ये दिसला. स्टेडियममध्ये टीम इंडियाच्या प्रशिक्षण सत्रादरम्यान कोहलीला जॅक कॅलिस (Jacques Kallis) आणि स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) यांच्या शैलीची नक्कल करताना दिसला. नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना विराट स्मिथच्या फलंदाजीच्या स्टाईलची फलंदाजीची कॉपी केली तर प्रशिक्षण सत्रादरम्यान गुलाबी बॉलने कॅलिसप्रमाणे गोलंदाजीकरण्याचाही प्रयत्न केला गेला. कोहलीच्या या दोन महान क्रिकेटपटूंच्या फलंदाजी आणि गोलंदाजीची नक्कल करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. विराटने माजी दक्षिण आफ्रिकी दिग्गज कॅलिसच्या गोलंदाजीची हुबेहूब नक्कल केली पण स्मिथच्या फलंदाजीचे त्याचे अनुकरण करताना पाहणे खरंच मजेदार होते. (IND vs ENG 3rd D/N Test Day 1: लोकल बॉय अक्षर पटेलचा जलवा; इंग्लिश फलंदाजांची हाराकिरी, पहिल्या डावात 112 धावांवर ऑलआऊट)

माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्मिथ टेस्ट सामन्यात गोलंदाजांना डिचवण्यासाठी फलंदाजी करताना नकल करत पाहतो. सध्या सुरू असलेल्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने प्रशिक्षणामध्ये कोहलीच्या कृतीचे फुटेज देखील प्रसारित केले होते. यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आरसीआय) अहमदाबादमधील तिसर्‍या कसोटी सामन्यापूर्वी आर अश्विन आणि उमेश यादवसह प्रशिक्षण सत्रात कोहलीच्या गोलंदाजीची क्लिपही शेअर केली होती. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीच्या सुरूवातीला पार्ट-टाइम गोलंदाज असणारा भारतीय कर्णधार गेल्या काही वर्षांत गोलंदाजीपासून दूर आहे आणि त्याने आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले आहे. कोहलीने खेळाच्या तीनही स्वरूपात भारतासाठी गोलंदाजी केली आहे आणि वेस्ट इंडीजविरुद्ध 2016 टी-20 वर्ल्ड कप सामन्यात अखेर विकेट घेतली होती.

दरम्यान, अहमदाबाद येथील तिसऱ्या सामन्यात विराटचे संपूर्ण लक्ष शतकाचा दुष्काळ संपवण्यावर असेल. चार सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी आहे आणि पिंक-बॉल टेस्ट ही दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या टीम इंडियाने एकमेव पिंक-बॉल टेस्ट जिंकली आहे तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील सामन्यात त्याना मोठा पराभव पत्करावा लागला होता.