सूर्यकुमार यादव (Photo Credit: Twitter/mipaltan)

IND vs ENG 3rd T20I: आंतरराष्ट्रीय टी-20 डेब्यूच्या 48 तासांनंतर सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) इंग्लंडविरुद्ध (England) तिसऱ्या सामन्याच्या भारतीय प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू देण्यात आला आहे. इंडियन प्रीमियर लीगची यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळणाऱ्या सूर्यकुमारने अहमदाबादच्या दुसऱ्या टी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते मात्र, त्याला सामन्यात बॅटने कमाल दाखवता आली नाही. सूर्यकुमारला मागील सामन्यात अक्षर पटेलच्या जागी स्थान देण्यात आले होते तर तिसऱ्या सामन्यात संघाचा धाकड फलंदाज रोहित शर्मासाठी स्थान रिकामे केले. शिवाय, पहिल्या दोन्ही सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरलेल्या केएल राहुलला (KL Rahul) प्लेइंग इलेव्हनमध्ये रिटेन केल्याने चाहत्यांना निसरासह झाली ज्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊसच पडला आणि संघाचा निर्णय अयोग्य असल्याच म्हटलं. (IND vs ENG 3rd T20I 2021: हिटमॅन Rohit Sharma तिसऱ्या टी-20 साठी मैदानात; इयन मॉर्गनने टॉस जिंकला, टीम इंडियाची बॅटिंग)

मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीतील फलंदाजाने दुसर्‍या टी-20 मध्ये भारताच्या विजयात बहुप्रतिक्षित पदार्पण केले होते पण ईशान किशन आणि विराट कोहलीने 165 धावांच्या लक्ष्याच्या भागीदारीत मोठी खेळी केल्यामुळे ‘स्काय’ला फलंदाजीची संधी मिळाली नाही. तिसऱ्या सामन्यात टॉस गमावल्यावर यजमान कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले की रोहित सलामीला राहुलसह उतरेल आणि ईशान किशन तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करेल. आपली अन्य खेळवुनदी टेस्ट घेण्यासाठी टीमने रोहितला पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टी-20 सामन्यात शिखर धवन आणि दुसऱ्या सामन्यात ईशाननंतर आता रोहित सलामीला उतरल्याने यजमान संघाने पहिल्या तीनही सामन्यात तीन वेगवेगळ्या जोडी ओपनिंगला उतरवली आहे. पहा सूर्यकुमारला डच्चू दिल्यावर यूजर्सच्या प्रतिक्रिया:

मला कसे वाटते याचे अचूक प्रतिनिधित्व!

खूप त्रास होतो... 

फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजाला बाहेर का ठेवता?

एकावेळी फक्त 3 मुंबई इंडियन्स खेळाडू दिसत आहे 

खूप छान!

सूर्यकुमारसाठी राहुल जागा का रिक्त करू शकत नाही?

स्काय बरोबर खरोखरच अन्याय!

रोहित शर्माचे फॅन: स्कायसाठी न्याय 

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाने मागील सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केला आहे. रोहित अखेर प्लेइंग इलेव्हनमध्ये कमबॅक केले तर सूर्यकुर्रमला एकही चेंडू न खेळता बाहेर पडावे लागले आहे. दुसरीकडे, इंग्लिश टीमकडून मार्क वूडने प्लेइंग इलेव्हनमध्ये केलं असून टॉम कुरनला बाहेर केलं आहे.