IND vs ENG 3rd T20I 2021: भारताविरुद्ध (India) तिसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंड कर्णधार इयन मॉर्गनने (Eoin Morgan) टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान भारतीय संघाने (Indian Team) मागील सामन्यात 7 विकेटने विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली असून तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघांचा आघाडी घेण्याचा निर्धार असेल. अशास्थितीत, आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाने मागील सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केला आहे. यजमान टीम इंडियासाठी मागील सामन्यात डेब्यू करणाऱ्या ईशान किशनने आपल्या धडाकेबाज अर्धशतकी कामगिरीच्या जोरावर स्थान कायम ठेवले आहे तर सूर्यकुमार यादवला बाहेर करत रोहित शर्माने (Rohit Sharma) अखेर प्लेइंग इलेव्हनमध्ये कमबॅक केले आहे. संघात अन्य खेळाडूंचे स्थान देखील कायम राहिले आहे. आता रोहितसह केएल राहुल यजमान संघासाठी डावाची सुरुवात करेल तर ईशान मधल्या फळीत दिसेल. (IND vs ENG ODI Series 2021: वनडे मालिकेसाठी भारताच्या ताफ्यात सामील होणार दोन नवीन अस्त्र, डोमेस्टिक लीगमध्ये कुटल्या धावा)
दुसरीकडे, इयन मॉर्गनच्या इंग्लिश टीमकडून जेसन रॉय आणि जोस बटलरची जोडी पुन्हा एकदा सलामीला येईल. मधल्या फळीत डेविड मलान, कर्णधार मॉर्गन, बेन स्टोक्स आणि सॅम कुरन यांच्यावर धावसंख्या वाढवण्याची जबाबदारी असेल. विशेष म्हणजे, मार्क वूडने प्लेइंग इलेव्हनमध्ये केलं असून टॉम कुरनला बाहेर केलं आहे. कर्णधार मॉर्गनसाठी आजचा सामना एका कारणाने विशेष आहे आणि तो म्हणजे आजच्या सामन्यात नाणेफेकीसाठी पाऊल ठेवले तेव्हा तो त्याच्या टी-20 कारकिर्दीमधील 100वा सामना ठरला. मॉर्गनने 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्याने आजवर त्याने 30.34च्या सरासरीने 2306 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून टी-20 सामन्यांची शंभरी करणारा मॉर्गन पहिलाच क्रिकेटर ठरला आहे. बटलर इंग्लिश संघाकडून दुसऱ्या सर्वाधिक 76 टी-20 सामने खेळला आहे.
पहा भारत इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन
भारत प्लेइंग XI: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, ईशान किशन, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, शार्दूल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमार.
इंग्लंड प्लेइंग XI: इयन मॉर्गन (कॅप्टन), जेसन राय, जोस बटलर, जॉनी बेयरेस्टो, डेविड मलान, बेन स्टोक्स, क्रिस जॉर्डन, सॅम कुरन, जोफ्रा आर्चर, मार्क वूड आणि आदिल रशीद.