रोहित शर्मा व केएल राहुल (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test: रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी इंग्लंडविरुद्ध (England) सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत गुरुवारी लॉर्ड्सवर (Lord's) भारतासाठी 69 वर्ष जुना विक्रम मोडला. 1952 नंतर प्रथमच रोहित आणि राहुल यांनी लॉर्ड्सवर भारतासाठी कसोटी सामन्यात 100 पेक्षा अधिक धावांची सलामी भागीदारीची नोंद केली. विनू मंकड (Vinoo Mankad) आणि पंकज रॉय (Pankaj Roy) हे शेवटचे भारतीय सलामीवीर होते ज्यांनी हा पराक्रम केला होता जेव्हा त्यांनी क्रिकेटच्या माहेर घरात 1952 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिल्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी केली होती. पण भारताच्या सध्याच्या सलामी जोडीने त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी बजावली आणि त्यांनी 36 व्या षटकात 106 धावांचा टप्पा ओलांडला. (Rohit Sharma Dismissal Video: अँडरसनच्या लाजवाब चेंडूने मोडले लॉर्ड्सवर Rohit Sharma याच्या शतकाचे स्वप्न भंगले, पाहा)

या दोघांपूर्वी 2007 मध्ये वसीम जाफर आणि दिनेश कार्तिक यांनी पहिल्या विकेटसाठी 100 पेक्षा जास्त धावांचा पल्ला गाठला होता. इतकंच नाही तर 41व्या षटकात 114 धावांचा टप्पा ओलांडत लॉर्ड्सवर पहिले फलंदाजी करण्यास सांगितल्यावर रोहित आणि राहुलने एका संघाच्या सर्वोच्च सलामी भागीदारीचा पल्ला गाठला. 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडच्या अॅलिस्टर कुक आणि अँड्र्यू स्ट्रॉस यांनी फलंदाजी करण्यास सांगितल्यावर सलामीसाठी 114 धावांची भागीदारी केली होती. यादरम्यान रोहित शर्माने वेगवान धावा करत होता तर केएल राहुलने एक टोक धरून त्याला चांगली साथ दिली. दोघांनीही इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला सामना केला आणि लवकर विकेट घेण्याची त्यांची योजना धुळीस मिळवली.

लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात रोहित आणि राहुलने फलंदाजीला अतिशय काळजीपूर्वक सुरुवात केली. अँडरसन आणि ऑली रॉबिन्सनच्या स्विंगसमोर दोघांनी सुरुवातीच्या ओव्हरमध्ये कोणतीही जोखीम घेतली नाही. पण 15 व्या षटकात रोहितने सॅम कुरनच्या चेंडूवर चार चौकार खेचत आपला इरादा स्पष्ट केला. पण जेम्स अँडरसनने रोहितचा त्रिफळा उडवत भारताची पहिल्या विकेटसाठी 126 धावांची आक्रमक भागीदारी मोडली.