IND vs ENG 1st Test 2021: इंग्लंडविरुद्ध (England) चेन्नई (Chennai) येथे सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट सामन्याचा पहिला दिवस टीम इंडियासाठी काही चांगला सिद्ध झाला नाही. पहिल्या दिवशी इंग्लंडने जो रूट आणि डॉम सिब्ली यांच्या दमदार द्विशतकी भागीदारीच्या जोरावर दिवसाखेर 3 बाद 263 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार जो रूटने शतक झळकावत आणि डोमिनिक सिब्लीसह 200 धावांची भागीदारी करत पाहुण्या संघाला पहिल्या दिवशी नियंत्रण मिळवून देत वर्चस्व राखले. अशास्थितीत, गोलंदाजांचे मनोधैर्य कायम राखण्यासाठी भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतची विकेटच्या मागे बडबड सुरु असताना सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि सलामी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) यांची फिरकी घेतली. (IND vs ENG 1st Test 2021: ‘मेरा नाम है वाशिंगटन, मुझे जाना है डीसी’! रिषभ पंतची मजेदार कमेंट स्टंप माइकमध्ये रैकॉर्ड, Video पाहून तुम्हालाही येईल हसू)
शाहबाझ नदीमच्या चेंडूवर रूटने मारलेला चेंडू बाउंड्री लाईनच्या पार जाताना कोहली आणि रोहित त्यांच्या चेहऱ्यावर असहाय्य भावाने टक लावून पाहत असतानाचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला त्यानंतर नेटिझन्सने ट्विटरवर भन्नाट मिम्सचा पाऊस पाडला. त्या व्हायरल फोटोवर यूजर्सने मिम-फेस्ट केला आणि काही क्षणातच फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला. फोटोवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया पहा.
जेव्हा नवख्या मुलगी वर्गात प्रवेश करते
When a newcomer girl enter in the class😹@imVkohli @ImRo45 #INDvENG pic.twitter.com/rODI6sOrIQ
— SHUBHAM (@RohitianShubham) February 5, 2021
पालक जेव्हा ते त्यांच्या मुलाला फोनकडे पाहत आणि हसत असतात तेव्हा
When I suddenly laugh looking at my mobile
My parents *@ImRo45 @imVkohli #INDvsENG pic.twitter.com/81B9Pre8tt
— MANOJ 45 (@manoj__45_) February 5, 2021
मी कुटुंबासह फेसबुक आणि गुगलवर चर्चा करताना
Me discussing a product with my family
Facebook and Google: pic.twitter.com/Hur2QS5abD
— Godman Chikna (@Madan_Chikna) February 5, 2021
जेव्हा सिंगल त्यांच्या क्रशसह फिरताना
When single boys see their friend Roaming with their crush. pic.twitter.com/qduP3QVA7N
— ImDDanger (@JaiswalVarrnit) February 5, 2021
फोटो ऑफ द डे!!
Pic of the day !#INDvENG pic.twitter.com/IsgTPkRmDq
— Sankalp (@SankalpT27) February 5, 2021
पीटी आणि गणित शिक्षक
*When English teacher passes by*
PTI and Maths teacher be like:- pic.twitter.com/OJepSexs2S
— Sudhanshu Ranjan Singh (@memegineers_) February 5, 2021
दोन मित्र त्यांच्या क्रशकडे पाहताना
Me and my friend watching at my crush in saree. #INDvENG pic.twitter.com/CiIxjKBhz7
— Ritik mishra (@ritik_mishra_) February 5, 2021
तत्पूर्वी, इंग्लंडने चेन्नईत नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. चार सामन्यांच्या मालिकेचे पहिले दोन सामने चेन्नईमध्ये होणार आहेत, तर अन्य दोन सामने अहमदाबादच्या सुधारित मोटेरा स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. दरम्यान, पहिल्या डावात टीम इंडियाविरुद्ध इंग्लंड संघ भक्कम स्थितीत पोहचला आहे. संघाने त्रिशतकी धावसंख्या गाठली असून सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जो रूटचा इंग्लंड संघ मोठ्या धावसंख्येच्या प्रयत्नात असेल.