IND vs ENG 1st Test 2021: भारताविरुद्ध (India) चेन्नई (Chennai) कसोटी सामन्यात इंग्लंड (England) फलंदाजांनी संयमी फलंदाजी करत टीम इंडिया गोलंदाजांच्या अडचणीत वाढ झाली. इंग्लंड कर्णधार जो रुटने (Joe Root) संयमी फलंदाजी करत द्विशतकी खेळी केली आणि सपाट खेळपट्टीवर कसून फलंदाजी केली. रूट वगळता डॉम सिब्ली आणि अष्टपैलू बेन स्टोक्स यांच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने दिवसाखेर 500 च्या पार मजल मारली आणि संघाला मजबूत स्थितीत पोहचवलं. चेन्नईच्या (Chennai) सपाट खेळपट्टीवर इंग्लंड फलंदाजांपुढे भारतीय गोलंदाज हतबल दिसले. भारताचे प्रमुख गोलंदाज रूटच्या खेळाडूंवर अंकूश ठेवण्यात अपयशी होत असताना कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) थेट सलामी फलंदाज रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हातात चेंडू सोपवला. रोहितने 2 ओव्हर गोलंदाजी केली आणि 7 धावा केल्या. मात्र, सध्या रोहितच्या गोलंदाजीच्या शैलीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. (IND vs ENG 1st Test Day 2: जो रूटची ऐतिहासिक द्विशतकी खेळी, दुसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाविरुद्ध इंग्लंडची 8 विकेट गमावून 555 धावांपर्यंत मजल)
जो रुट फलंदाजीला असताना सत्राच्या आपल्या अंतिम चेंडूवर रोहितने आपला माजी साथीदार हरभजन सिंहच्या गोलंदाजीची नक्कल करून आपल्या उर्वरित साथीदारांना चकित केलं. भज्जीप्रमाणेच रोहितने हॉप आणि स्किप केलं. रोहितच्या या चेंडूवर रूटने एक धाव घेतली. रोहितने भज्जीच्या गोलंदाजीच्या नक्कल केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकरी 'हिटमॅन'च्या गोलंदाजीचं तोंडभरून कौतुक करत आहेत. चाहतेच नाही तर रोहितच्या गोलंदाजीने कर्णधार विराट कोहलीसह भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावरही हास्य उमटले आणि दुसऱ्या कठीण सत्रानंतर ड्रेसिंग रूमकडे रवाना झाले. पहा व्हिडिओ
Rohit Sharma imitating Bhajji's Action on the last ball before Tea 🤣@ImRo45 • @harbhajan_singh pic.twitter.com/MhsQxPbJcc
— Saish 💫 (@CricketSaish45) February 6, 2021
दुसरीकडे, पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने 8 विकेट गमावून 555 धावांपर्यंत मजल मारली. रूटने सर्वाधिक 218 धावा केल्या तर डॉम सिब्लीने 87 आणि बेन स्टोक्सने 80 धावांची खेळी करत रूटला चांगली साथ दिली. ओली पोप 34 आणि जोस बटलरने 30 धावांचे योगदान दिले. रॉरी बर्न्सने 33 धावा केल्या. भारतासाठी इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये इंग्लंडला सलग दोन झटके दिले. यापूर्वी, जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन आणि शाहबाझ नदीमला प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या.