IND vs ENG 1st T20I 2021: भारताच्या लज्जास्पद पराभवानंतर Virat Kohli याने स्वीकारली चूक, पहा कोणावर फोडले पराभवाचे खापर
विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st T20I 2021: इंग्लंडकडून (England) अवघड खेळपट्टीवर सलामीच्या टी-20 सामन्यात पराभव पत्करलेल्या यजमान टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीने ((Virat Kohli) सामन्यात उद्भवलेल्या आव्हानाला तोंड द्यायला आपण तयार नसल्याचं कबुल केलं. फलंदाजीसाठी आमंत्रित भारताने मोटेरा स्टेडियमवर (Motera Stadium) फलंदाजांना इंग्लिश गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करावा लागला आणि अखेर संघ निर्धारित ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 124 धावाच करू शकला. इंग्लंडने धावसंख्येचा सहज पाठलाग केला आणि 15.3 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 130 धावा केल्या. कोहली, केएल राहुल आणि शिखर धवन खराब फटका खेळत बाद झाले ज्यामुळे भारतीय कर्णधार चिंताग्रस्त दिसला. “या प्रकारच्या खेळपट्टीवर आपल्याला काय करावे लागेल याबद्दल आम्हाला पुरेसे माहिती नव्हती. मला वाटते की आमच्या शॉट्सवर अंमलबजावणीचा अभाव आणि आम्हाला काहीतरी गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे,” सामन्यानंतर विराट म्हणाला. (IND vs ENG 1st T20 2021: विराट कोहलीवर ओढावली नामुष्की, Yuzvendra Chahal बनला नंबर 1 गोलंदाज, पहिल्या टी-20 सामन्यात बनले हे प्रमुख रेकॉर्ड)

“आपले दोष स्वीकारा, अधिक उद्दीष्टाने परत या, आपण फटका मारू इच्छित असलेल्या क्षेत्राचे स्पष्टीकरण घेऊन. आम्हाला पाहिजे असलेले फटके खेळण्याची परवानगी विकेटने दिली नाही.” दरम्यान, श्रेयस अय्यरच्या निर्धारामुळे कोहली खूश झाला ज्याने अर्धशतक ठोकत टीम इंडियाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. “श्रेयसने क्रीजचा वापर कसा करावा आणि बाऊन्स कसा खेळायचा हे दाखवले. इंग्लंडने आम्हला खालच्या स्तराची फलंदाजीची करायला भाग पडले. आम्ही काही गोष्टी पाहण्याचा विचार केला परंतु आम्हाला स्थिती मान्य करावी लागेल. जर खेळपट्टी अनुकूल असली तर आपण पहिल्या चेंडूपासून आक्रमक होऊ शकता. आम्ही मूल्यांकन करण्यासाठी पुरेसा वेळ घालवला नाही,श्रेयसने कामगिरी बजावली पण 150-160 धावसंख्या गाठण्यासाठी आम्ही बऱ्याच विकेट गमावल्या.”

दरम्यान, इंग्लंड ओपनर जेसन रॉयच्या दणदणीत खेळीमुळे इंग्लंडने सहज धावसंख्या गाठली. कर्णधार इयन मॉर्गनने देखील रॉयचा संघावर होणारा परिणाम दर्शवला. “संघाप्रमाणे बाहेरही मोठी स्पर्धा आहे. जे धावा करतात आणि चांगले काम करतात अशा खेळाडूंना मोठा पाठिंबा, आणि जेसन जेव्हा खेळतो संघाची उत्सुकता दर्शवतो.” नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यरच्या 67 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने सात गडी गमावून 124 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 27 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. सामन्यात श्रेयस वगळता अन्य कोणताही फलंदाज इंग्लंड गोलंदाजांना सामोरा जाऊ शकला नाही.