IND vs BAN 2nd Pink Ball Test: माइकल वॉन याने सौरव गांगुली ला डे-नाईट टेस्टसाठी शुभेच्छा देत दिली चेतावणी, भारतीय चाहत्यांनी केले ट्रोल, पाहा Tweets
सौरव गांगुली आणि माइकल वॉन (Photo Credit: Getty Images)

इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉन (Michael Vaughan) याने बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly यांना भारतात पिंक-बॉल कसोटी सामन्याबद्दल अभिनंदन केले आणि पुढील हिवाळ्यात ऑस्ट्रेलिया (Australia) मध्ये दोन सामने खेळताना पाहावयास उत्सुक असल्याचे सांगितले. ज्यानंतर सोशल मीडिया यूजर्सने त्यालाल चांगलेच ट्रोल केले आहे. टीम इंडिया आणि बांग्लादेश संघात पहिल्यांदा गुलाबी टेस्ट खेळली जात आहे. दोन्ही संघ पहिल्यांदा गुलाबी बॉलने टेस्ट सामना खेळत आहे. गांगुलीने गुरुवारी, 21 नोव्हेंबरला जय शाह याला टॅग करत पिंक टेस्टचे कोलकातामध्ये स्वागत केले आणि ईडन गार्डन्सचे गुलाबी रंगात रंगलेले फोटोदेखील शेअर केले. गांगुलीचे हे रिट्विट करत इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने पोस्ट करत लिहिले की, "अत्यंत छान सौरव, पण हिवाळी मोसमात ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेसाठीही आपण तयार असले पाहिजे." (IND vs BAN 2nd Test Day 1: ईडन गार्डन्सवर दिसला 'उड़ता रोहित' कॅच बघून तुम्ही ही म्हणाल OMG, पाहा व्हिडिओ)

माइकलच्या या ट्विटनंतर भारतीय चाहत्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले. चाहत्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या. ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झालेल्या कोलकाताचा ‘गुलाबी’ रंगात सजला सजलेला व्हिडिओ सौरवने शेअर केला होता. पाहा वॉनचे ट्विट:

भारतीय चाहत्यांनी दिल्या अश्या प्रतिक्रिया:

3 दिवसही टिकणार नाही...

पुन्हा सर्जिकल स्ट्राइक

आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये गुलाबी बॉलने टेस्ट खेळू आणि त्यांना पराभूत करू

भारतात या आणि कुठल्याही बॉल बरोबर खेळा... तुम्हाला धूळ चरायला लावू

कोलकातामधील टेस्टआधी पत्रकार परिषदेत विराट कोहली यानेही ऑस्ट्रेलियामध्ये ;पिंक बॉल टेस्ट खेळण्याबद्दल आपले मत स्पष्ट केले. भारतीय संघाने 2017-18 च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर डे-नाईट टेस्ट खेळण्यास नकार दिला होता. यावर प्रश्न विचारले विराटला पुढील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर डे-नाईट टेस्ट खेळणार का असे विचारले असता कोहलीने हो म्हणून उत्तर दिले पण त्याने एक अट घातली आणि म्हणाला की, "'जेव्हा हे होईल तेव्हा त्यापूर्वी सराव सामना व्हावा लागेल.' त्याने सांगितले की भारतीय टीम 2017-18 दौऱ्यादरम्यान भारतीय संघाने अ‍ॅडलेडमध्ये खेळण्यास नकार दिला होता, कारण संघाला परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी सराव सामना नाही मिळाला होता. भारत आणि बांग्लादेशमधील या प्रसंगी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी मैदानावरील ईडन बेल वाजवून सामन्याची सुरुवात केली. या ऐतिहासिक प्रसंगी साक्षीदार म्हणून क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीस लक्ष्मण, अनिल कुंबळे, सुनील गावस्कर, हरभजन सिंह देखील उपस्थित आहेत.