बांग्लादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हसन याच्यावर भारत दौऱ्यातून बाहेर पडण्याची नामुष्की, जाणून घ्या कारण
शाकिब अल हसन (Photo Credit: Getty Images)

बीसीबी (BCB) आणि खेळाडूंमधील संघर्षाच्या पाच दिवसांनंतर बांगलादेश क्रिकेटमध्ये सर्व काही ठीक दिसत नाही, विशेषत: जेव्हा शाकिब अल हसन याचा विचार केला तर. संप संपल्यानंतर आतापर्यंत तीनपैकी दोन दिवस झालेल्या राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षण सत्रात शाकिबने सहभाग घेतला नाही. बंगाली दैनंदिन 'प्रथोम आलो'ला दिलेल्या मुलाखतीत बीसीबी अध्यक्ष नझमुल हसन यांनी म्हटले आहे की, काही खेळाडूंना, यात त्यांनी विशेषतः शकीबचे नाव घेतले, यांना आगामी भारत दौऱ्यातून वगळले जाऊ शकते. बांग्लादेशचा भारत दौरा 3 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे आणि यासाठी संघ बुधवारी रवाना होईल. या दौऱ्यादरम्यान दोन्ही संघ 3 टी-20 आणि 2 सामन्यांची टेस्ट मालिका खेळतील. पीठच्या दुखापतीमुळे मोहम्मद सैफुद्दीन याने आधीच माघार घेतली आहे, तर तमीम इक्बाल यांनी आपल्या गर्भवती पत्नीसोबत राहण्याचा पर्याय निवडला आहे. (IND vs BAN 2019: खराब हवा असूनही दिल्लीमध्येच होणार भारत-बांग्लादेश संघातील पहिला टी-20 सामना, BCCI ने दिले स्पष्टीकरण)

या प्रकरणात आणखी गुंतागुंत निर्माण करण्यासाठी बीसीबीने 'ग्रामीणफोन' सोबतच्या शाकिबच्या नुकत्याच केलेल्या करारास 'बेकायदेशीर' म्हटले आहे. हसन यांनी म्हटले आहे की बोर्डाने खेळाडूंना कोणत्याही दूरसंचार कंपनीबरोबर करार करू नका असे सांगितले होते. दरम्यान, शाकिबला त्याची बाजू स्पष्ट करण्यासाठी त्याला कारणे दाखवा नोटीस पाठविली गेली आहे आणि आज नंतर संघ मीरपूरमधील त्यांच्या अंतिम प्रशिक्षण सत्रात भाग घेईल. तेथे एक सराव सामना खेळला जाईल.

शाकिबवर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही, परंतु केंद्रीय कराराच्या अटींचे उल्लंघन केल्याबद्दल बांग्लादेशच्या कसोटी आणि टी-20 कर्णधारकाला कारणे दाखवा नोटीसचे उत्तर द्यावे लागेल, असे मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी यांनी सांगितले.